शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इसे बोलते है " विलपॉवर "..कॅन्सरवर मात करून ‘तो ’ धावतोय महामॅरेथॉन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 12:37 IST

वयाच्या सहाव्या वर्षी त्याला ब्रेन ट्युमर असल्याचे निदान झाले. २०११ पासून उपचार सुरू आहे.

ठळक मुद्देऔरंगाबादच्या पराग लिगदेची कामगिरी : पुण्यात लोकमत महामॅरेथॉनमध्ये होणार सहभागी

पुणे : कॅन्सर हा दुर्धर आजार आहे, असे मनात पण आणायचे नाही. आपल्यात आत्मविश्वास असला पाहिजे, तर आपण कॅन्सरवर मात करून उभे राहू शकतो. घाबरून जायचे नाही. विलपॉवर स्ट्राँग ठेवायची. ह्या भावना आहेत वयाच्या सहाव्या वर्षी झालेल्या कॅन्सरशी झुंज दिलेल्या औरंगाबादचा पराग लिगदे याची. तो रविवारी ( दि.१६) पुण्यात होणाºया ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावण्यासाठी सज्ज आहे. अवघ्या १५ वर्षांचा पराग आतापर्यंत १३ मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी झालेला आहे. 

परागला वयाच्या सहाव्या वर्षी ब्रेन ट्युमर असल्याचे निदान झाले. २०११ पाासून उपचार सुरू आहे. आतापर्यंत ७० केमोथेरपी घेतल्या आहेत. दर आठ दिवसाला केमोथेरपी घ्यावी लागत होती. त्याच्या शरीराची सारखी आग व्हायची. आई-वडिलांना मांडीवर घेऊन बसावे लागायचे दोन वर्षे रुग्णशय्येवर झोपून होता. स्वत:ला उठता येत नव्हते. धरून उठवावे लागत होते. स्वत:ला चालतापण येत नव्हते. मी ७ ते ८ महिने बोलत पण नव्हता. शस्त्रक्रिया झाल्यावर फरक पडत गेला. ७ ते ८ महिने फिजिओथेरपी करावी लागली. त्यानंतर हळूहळू चालायला लागला. वडील श्रीनिवास आणि आई वैशाली यांनी उपचारात कोणतीही कसर ठेवली नाही. हलाखीची परिस्थिती असतानाही त्याच्यासाठी जीवाचे रान केले. त्यामुळे परागलाही बळ मिळतगेले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी परागने धावणे सुरू केले. मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ लागला. लोकमतच्या सर्व शहरातील मॅरेथॉनमध्ये तो धावला आहेच. नुकताच मुंबई मॅरेथॉनमध्येही धावून आला. विशेष म्हणजे त्याचे आई-बाबाही सोबत धावतात. आई-बाबा माझ्या सोबत धावण्याची / चालण्याची मॅरेथॉन असली की माझ्यासोबत धावतात. मी आतापर्यंत १२ ते १३ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे........मॅरेथॉनने दिले आत्मबळ...मॅरेथॉनमध्ये धावण्याने परागला आत्मबळ दिले आहे. तो म्हणतो, आई-बाबांच्या चेहºयावर हसू पाहण्यासाठी प्रत्येक स्पर्धेत भाग घेणार आहे. कॅन्सर हा दुर्धर आजार आहे, असे मनात पण आणायचे नाही. आपल्यात आत्मविश्वास असला पाहिजे, तर आपण कॅन्सरवर मात करून उभे राहू शकतो. घाबरून जायचे नाही. विलपॉवर स्ट्राँग ठेवायची. मी इतरांसारखे आयुष्य जगू शकतो, हे पाहिल्यावर आईने मला मिठी मारली. तिच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू येत होते. म्हणूनच पुण्यातील ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावण्यासाठीही तो सज्ज झाला आहे. 

टॅग्स :Puneपुणेcancerकर्करोगMarathonमॅरेथॉनLokmat Eventलोकमत इव्हेंट