शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

' त्याने ' प्रामाणिकपणा दाखवत बँकेला परत केले नजरचुकीने आलेले पन्नास हजार रुपये...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 21:07 IST

बँक कर्मचाऱ्याच्या नजरचुकीने देण्यात आले जास्तीचे पाचशे रुपयांच्या नोटांचे २ बंडल

पुणे : सध्या आजूबाजूला आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस येत असतात. कधी फसवणुकीचे हे प्रकार जवळच्या नातेवाईक तर कधी अज्ञात व्यक्तींकडून घडवून आणतात. पण समाजात जरी फसवणुकीच्या घटना वाढत असल्यातरी प्रामाणिकता देखील तितकीच टिकून आहे. खराडी येथील बँक ऑफ महाराष्ट्रकडून नजरचुकीने आले ज्यादाचे पैसे त्याने बँकेला परत केले. हा प्रामाणिकपणा पाहून बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले..   सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योग शिक्षक मंगेश ठोमके नेहमीप्रमाणे आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेत गेला होता . त्याला पन्नास हजार काढायचे होते. पण नजरचुकीने त्याला बँक कर्मचाऱ्याकडून नजरचुकीने पाचशेच्या नोटांचे २ बंडल देण्यात आले. मंगेशला वाटले कि २५ -२५ हजारांचे दोन बंडल आहे. त्याने आहे तसे घेत बॅगेत ठेवले. त्याने घरी आल्यावर देखील पैसे मोजले नाही. ते पुन्हा दुसऱ्या बँकेत ज्यावेळी पैसे भरण्यासाठी गेले तेव्हा त्याला बँक ऑफ महाराष्ट्र बँकेकडून पन्नास हजारऐवजी एक लाख रुपये आल्याचे लक्षात आले. त्याने ज्यादा आलेले रुपये बँकेत जाऊन जमा केले. त्याच्या प्रामाणिकपणाचे बँकेच्या कर्मचारी व अधिकार वर्गाने कौतुक केले.मंगेश हे ठिकठिकाणी योगाचे क्लासेस घेत असतात. यापूर्वीही घडलेल्या प्रसंगात मंगेशने प्रामाणिकपणा जपला आहे.  मंगेश म्हणाला, मी पैसे काढण्यासाठी बँकेत गेलो होतो. तेव्हा बँक कर्मचाऱ्याच्या नजरचुकीने जास्तीचे पाचशे रुपयांच्या नोटांचे २ बंडल देण्यात आले. मला वाटले २५ - २५ हजार रुपयांचे ते २ बंडल असतील पण प्रत्यक्षात ते एक लाख रुपये निघाले. तात्काळ पैसे परत करण्यासाठी बँकेत गेलो. त्यावेळी तिथे देखील पैसे कुणाला जास्तीचे पैसे गेले यासंबंधी धावपळ तपासणी सुरु होती. जेव्हा त्यांना माझ्याकडे नजरचुकीने ज्यादाचे पैसे आल्याचे सांगितले तेव्हा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना गहिवरून आले. त्यांनी मंगेश यांना कौतुकाचे पत्र दिले. 

टॅग्स :PuneपुणेYogaयोगTeacherशिक्षकBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्र