शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पंचक्रोशीत आपल्या धन्याला 'त्या'ने नावलौकिक मिळवून दिलं; बळीराजाने पण त्याचं ऋण 'असं' फेडलं..!    

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 12:39 IST

2013 पासुन बैलगाडा शर्यतबंद असल्याने अनेकांनी बैलांची विक्री केली. मात्र कांताराम पठारे याला अपवाद आहेत.

विशाल दरगुडे  पुणे : पुणे जिल्ह्यामध्ये बैलगाडा शर्यतीला खूप महत्त्व दिले जाते. त्याचप्रमाणे शेतकरी हा आपल्या बैलाला जिवापाड जपून त्याची काळजी घेत असतो.  बैलगाडा शर्यतीमध्ये ज्या बैलाने आपल्या मालकाला सर्वत्र नावलौकिक मिळवून स्वतःची देखील एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याचा मृत्यू झाल्यावर ह्या बळीराजाच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. या कुटुंबाने आपल्या लाडक्या बैलाची आठवण म्हणून सर्व विधी करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी 'संज्या' बैलाचा दशक्रिया विधी करून त्याची आठवण कायम स्मरणात राहावी या हेतूने शेतामध्ये त्याचे स्मारक उभारले आहे. 

अहमदनगरमधील पठारवाडी येथे संज्याचा जन्म झाला. केवळ एक वर्षाचा असतानाच कांताराम पठारे यांनी त्याला विकत घेतले. १७ वर्षीय संज्या बैलाने पुणे जिल्ह्यामध्ये विविध बैलगाडा शर्यतीमध्ये या बैलाने नंबर एकचा मानकरी ठरून मोठे नाव कमावले होते. फुलगाव येथे झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये या बैलाला 'हिंदकेसरी' हा किताब देण्यात आला. या बैलाने पठारे यांचे नाव ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातुन घरोघरी पोहचवले.  मात्र बैलाचे निधन झाल्याने पठारे कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माणसाप्रमाणे पठारे यांनी आपल्या लाडक्या बैलाला निरोप देत दशक्रिया विधी मध्ये मुंडन करून दुखवटा पाळला.2013 पासुन बैलगाडा शर्यतबंद असल्याने अनेकांनी बैलांची विक्री केली. मात्र कांताराम पठारे याला अपवाद आहेत.

खराडी येथील शेतकरी कांताराम दत्तोबा पठारे यांच्या संज्या बैलाचे 2 सप्टेंबरला निधन झाले. त्यामुळे पठारे कुटुंबाने आपल्या लाडक्या बैलाची आठवण म्हणून सर्व विधी करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी 'संज्या' बैलाचा दशक्रिया विधी करून त्याची आठवण कायम स्मरणात राहावी या हेतूने कांताराम पठारे यांनी मरकळ (ता.खेड) येथील त्यांच्या शेतामध्ये त्याचे स्मारक उभे केले आहे.

.......

जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी माझी ओळख हिंदकेसरी म्हणुन माझ्या संज्याने ओळख निर्माण केली. पहिल्यांदाच एखाद्या माणसाला त्याच्या बैलामुळे ओळख निर्माण झाली आहे.त्यामुळे ही ओळख व संज्याची आठवण कायम सोबत राहवी म्हणुन संज्याचे स्मारक उभारले आहे.-कांताराम दत्तोबा पठारे,स्व.संज्याचे(बैलाचे)मालक' 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीBull Cart Raceबैलगाडी शर्यतDeathमृत्यू