शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बायकोला त्याने असे काही 'इम्प्रेस'केले; पोलिसांनी थेट तुरुंगातच धाडले

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: January 2, 2021 13:14 IST

प्रत्येक जण आपापल्यापरीने तुमच्यासाठी काही पण म्हणत पत्नीचे मनं जिंकण्याचा प्रयत्न करत असतो.

पुणे : एकदा का सात फेरे घेऊन नवीन संसाराला सुरुवात केली की बायकोला खुश करण्यासाठी नव नवे फंडे वापरणाऱ्यांची आपल्याकडे काही कमतरता नाही. प्रत्येक जण आपापल्यापरीने तुमच्यासाठी काय पण म्हणत पत्नीचे मनं जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. पण पुण्यात एका बहाद्दराने कमालच केली. त्याने असं काही पाऊल उचललं की बायको खुश झाली पण त्याची रवानगी थेट तुरुंगात झाली. 

याप्रकरणी पोलिसांनी माळवाडी परिसरात राहणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. त्याचे नाव रोहन बिरू सोनटक्के (वय २१) असे आहे. तो बायकोची हौस पुरवण्यासाठी व मन जिंकण्याच्या उद्देशाने शहरातील विविध दुकानांतून चक्क साड्या तसेच ड्रेसची चोरी करत होता. साडी चोरण्यासाठी तो नवनवीन पद्धत वापरत असे. पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या कसून चौकशीत तो साड्यांबरोबरच मोबाइल, लॅपटॉप आणि गाड्याही चोरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल १८ मोबाइल, ३ लॅपटॉप, ३० साड्या, १२ ड्रेस यांसह विविध ठिकाणी चोरलेल्या काही गाड्या असा अंदाजे साडे तेरा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहन सोनटक्के याचे नवीनच लग्न झाले होते. त्यामुळे तो आपल्या पत्नीला खुश करण्यासाठी साड्या, ड्रेस चोरण्याचं काम करत होता. त्याचबरोबर तो मोबाईल, लॅपटॉप, गाड्या यांची देखील चोरी करत असे. पण त्यादिवशी रोहन हडपसर येथील ॲमनोरा मॉल परिसरात चोरलेल्या मोबाइलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे यांना मिळाली होती. त्या आधारे लोणारे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी रोहन याला अटक केली आहे. गुन्हे शाखेला त्याच्यासंबंधी ९ गुन्हे उघडकीस आणले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकmarriageलग्न