पोलिसांवर हल्ला करुन पळून गेलेला मुंबई विमानतळावर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:14 IST2021-02-05T05:14:12+5:302021-02-05T05:14:12+5:30
पुणे : अंदमान येथील न्यायालयाचे वाॅरंट बजावल्यानंतर पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून गेलेल्यास देशाबाहेर पळून जाताना मुंबई विमानतळावर पकडले. ...

पोलिसांवर हल्ला करुन पळून गेलेला मुंबई विमानतळावर जेरबंद
पुणे : अंदमान येथील न्यायालयाचे वाॅरंट बजावल्यानंतर पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून गेलेल्यास देशाबाहेर पळून जाताना मुंबई विमानतळावर पकडले.
उत्कर्ष बाळासाहेब पाटील (रा. प्रिझम अपार्टमेंट, औंध) असे त्याचे नाव आहे. अंदमान येथील पोर्ट ब्लेअरमधील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी पाटील विरोधात वॉरंट काढले होते. ते येरवडा पोलिसांनी त्याच्यावर बजावून त्याला येरवडा पोलीस ठाण्यात २६ जानेवारी रोजी रात्री आणले होते. आपला हात दुखत असल्याने कारमधील हिटरला शेकतो, असा बहाणा करुन त्याने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून गेला होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना गुन्हे शाखेच्या युनिट ४ मधील पोलीस नाईक सुरेंद्र साबळे यांनी त्याचा फोटो व मोबाईल नंबर माहिती मिळवली. पाटील हा चेन्नई येथून विमाने मुंबई विमानतळावर येऊन लगेच परराज्यात जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, हवालदार रुपेश वाघमारे, सुरेंद्र साबळे हे तातडीने सांताक्रुझ विमानतळावर गेले. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने उत्कर्ष पाटील याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले.