शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात आळंदी म्हातोबाची येथे महिलेनं २ वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 20:34 IST

महिला आपल्या मुलासह मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार कविताच्या नातेवाईकांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती.

थेऊर : आळंदी म्हातोबाची येथील एका ३० वर्षीय महिलेने आपल्या दोन वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमरास उघडकीस आला आहे. कविता देविदास भोसले (वय ३०, रा. भेकराईनगर, मूळगाव उमरगा जि. उस्मानाबाद) व प्रणीत देविदास भोसले (वय - २ ) असं लहान मुलासह आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता आपल्या मुलासह मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार कविताच्या नातेवाईकांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार हडपसर पोलीस कविता चा शोध घेत असताना कविताच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन आळंदी म्हातोबा येथे असल्याचे आढळून आले होते.

त्यानुसार लोणी काळभोर पोलिस व हडपसर पोलीस आळंदी म्हातोबाची गावाच्या परिसरात शोध घेत असताना, गायकवाड वस्ती येथील एका विहिरीत महिलेचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदरचा मृतदेह हा कविता व तिच्या मुलाचा असल्याचे आढळून आले आहे. लोणी काळभोर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई चालू आहे.

टॅग्स :HadapsarहडपसरWomenमहिलाDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी