शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

LOVE SEX AUR DHOKA: मैत्रिणीला घरी बोलावले अन् गुंगीचे औषध देऊन बलात्कार; 3 वर्षापासून लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 14:02 IST

घटनेचे चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देत सतत ३ वर्ष या तरुणीवर लैंगिक अत्याचार

पुणे/किरण शिंदे: पुण्यातील खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 22 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून घरी बोलावले. तिला स्लाईसमध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. या घटनेचे चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देत सतत तीन वर्ष या तरुणीवर लैंगिक अत्याचार केले जात होते. अखेर पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर तिच्या मित्रासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

दीक्षांत गौतम चव्हाण (रा. रेंजहिल्स, खडकी, पुणे), दुर्योधन भापकर आणि डॉन ( पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. 22 वर्षीय तरुणीने या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी दीक्षांत चव्हाण यांची ओळख होती. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले. लग्नाची बोलणी करण्यासाठी आई-वडिलांना बोलायचे आहे असे सांगून तिला त्याच्या राहत्या घरी नेले. घरी गेल्यानंतर त्याने स्लाईसमधून गुंगी येण्याचे औषध तिला पिण्यास दिले. हे स्लाईस पिल्यानंतर काही वेळाने फिर्यादी बेशुद्ध झाल्या. त्यानंतर आरोपीने तिच्या अंगावरील संपूर्ण कपडे काढून लैंगिक अत्याचार केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार करून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत लग्न करण्यासाठी दबाव टाकला. इतकच नाही तर हा व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत वेळोवेळी तिला राहत्या घरी बोलवून लैंगिक अत्याचार केले. 

दरम्यान आरोपी दुर्योधन भापकर याने देखील "माझ्याकडे तुझा व्हिडिओ आहे"  असे सांगून फिर्यादीचा हात पकडून जवळ ओढत विनयभंग केला. तर तिसऱ्या आरोपीने "तू कोणाच्या नादी लागतेस, भापकर कोण आहे हे तुला माहित आहे का, ते तुला संपवून टाकतील" असं म्हणून झालेला विषय कुणाला सांगू नकोस अन्यथा खल्लास करून टाकायला वेळ लागणार नाही असे म्हणत धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकWomenमहिलाsexual harassmentलैंगिक छळ