इंदापूर तालुक्यातील गावांचे सरपंच ठरले, मात्र अनेकांच्या स्वप्नांचा चुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:12 IST2021-02-05T05:12:26+5:302021-02-05T05:12:26+5:30

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांच्या आरक्षण सोडती शुक्रवार ( दि. २९ ) रोजी इंदापूर ...

He became the Sarpanch of the villages in Indapur taluka, but shattered the dreams of many | इंदापूर तालुक्यातील गावांचे सरपंच ठरले, मात्र अनेकांच्या स्वप्नांचा चुरा

इंदापूर तालुक्यातील गावांचे सरपंच ठरले, मात्र अनेकांच्या स्वप्नांचा चुरा

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांच्या आरक्षण सोडती शुक्रवार ( दि. २९ ) रोजी इंदापूर शहरातील शहा संस्कृतिक भवन येथे तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या उपस्थितीत पार पडल्या. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून गावचा सरपंच कोण होणार या विषयावर पडदा पडलेला असून, आता मात्र गावचे सरपंच या आरक्षण सोडतीने निश्चित झाले आहेत.

औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने अनुसूचित जाती व जमातीच्या संदर्भातील आरक्षणाची सोडत इंदापूर तालुक्यामध्ये जशी आहे तशी ठेवण्यात आलेले आहे. यातील आरक्षणात कोठेही बदल न करता पहिली ठेवण्यात आलेली आहे. परंतु गावागावात गुडघ्याला बाशिंग बांधून, सदस्य म्हणून निवडून आला आणि सरपंच म्हणून मिरवत होता. अशा लोकांच्या स्वप्नांचा चक्काचूर या सोडतीमुळे झालेला आहे. आज अक्षरशः इंदापूर येथील सोडत स्थळी तालुक्यातील गावागावातील नवनिर्वाचित सदस्य व गाव पुढारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोनाक्षी योगेश साळवी ( वय १२ ) हिच्या हस्ते त्यांची सोडत काढण्यात आली. इंदापूर तहसील कार्यालयाची निवासी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, यांच्यासह तहसील कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

खालील प्रमाणे सरपंच आरक्षण सोडत झालेली ११५ गावे व प्रवर्ग.

सर्वसाधारण महिला : पवारवाडी, गलांडवाडी नं २, कांदलगाव, डाळज नंबर १, बिजवडी, पिंपरी बुद्रुक, कळाशी, भोडणी, बाभूळगाव, डाळज नं २, शेळगाव, निरवांगी, कालठण नं १, बेलवाडी, न्हावी, निंबोडी, नीर निमगाव, काझड, गांजेवळण, सराफवाडी, लुमेवाडी, बळपुडी, शिरसटवाडी, दगडवाडी, पंधारवाडी, थोरातवाडी, गिरवी, आजोती, रेडा, माळवाडी.

सर्वसाधारण : सणसर, शेटफळगडे, तावशी, वडापुरी, चिखली, काटी, निमसाखर, टणू, अकोले, कुरवली, कुंभारगाव, हगारेवाडी, सुरवड, अगोती नं. १, जाचकवस्ती, पिंपळे, शहा, पिंपरी खुर्द, गोतोंडी, लोणी देवकर, जाधववाडी, कचरवाडी ( निमगाव केतकी), तरंगवाडी, झगडेवाडी, वालचंदनगर, शेटफळ हवेली, वरकुटे खुर्द, तक्रारवाडी, भादलवाडी, भावडी, घोरपडवाडी.

नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण : आनंदनगर, गोखळी, म्हसोबाचीवाडी, चाकाटी, पिठेवाडी, खोरोची, व्याहाळी, लासुर्णे, मानकरवाडी, पडस्थळ, सरडेवाडी, भिगवण, डाळज नं ३, पळसदेव, निमगाव केतकी.

नागरिकांचा मागास प्रवर्गातील स्त्री - रेडणी, लाखेवाडी, भरणेवाडी, मदनवाडी, कचरवाडी बावडा, सराटी, वकीलवस्ती, भांडगाव, अगोती नंबर २, बोरी, बोराटवाडी, बावडा, कौठळी, रुई, अवसरी, गोंदी - ओझरे.

अनुसूचित जाती सर्वसाधारण : पोंधवडी, वरकुटे बुद्रुक, लाकडी, जांब, अंथुर्णे, कडबनवाडी, रणमोडे वाडी, चांडगाव, कालठण नंबर २, भाटनिमगाव

अनुसूचित जाती महिला : तरटगाव, उध्दट, निरगुडे, जंक्शन, कळंब, हिंगणगाव, नरसिंहपूर, सपकळवाडी, पिटकेश्वर, गलांडवाडी नंबर १

अनुसूचित जमाती महिला : डिकसळ.

२९ इंदापूर सोडत

इंदापूर शहरातील शहा संस्कृतिक भवन येथे सरपंचपदाचे आरक्षण सोडत उपस्थित मान्यवर.

Web Title: He became the Sarpanch of the villages in Indapur taluka, but shattered the dreams of many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.