शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करून महिलेबरोबरही केला गैरवर्तनाचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 12:05 IST

हिंजवडीत चित्रिकरणासाठी आलेल्या १८ जणांविरोधात गुन्हा दाखल

ठळक मुद्देहॉटेलच्या कर्मचारी महिलेचा विनयभंग

पिंपरी: जेवण देण्यास उशीर झाल्याने तोडफोड करून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी १८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रीकरणासाठी आल्याने आरोपी हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते.  त्यावेळी रविवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

सलमान मोहम्मद अकरम खान (वय २४, रा मुंबई), अनिल गुप्ता (वय ४२, रा.ठाणे), धर्मेन्द्र कुमार (वय २८, रा. ठाणे), सूर्यकांत साहू (वय ३१, रा. मुंबई), अनिल तानाजी पराडकर (वय ३९, रा. मुंबई), गौतम शर्मा (वय ४२, रा. बिहार), सुहास रंजन (वय ५१, रा. बिहार), कुलदीप विश्वकर्मा (वय ३३), राजकुमार यादव (वय ४०, दोन्ही रा. झारखंड), बालू शाहू (वय ४०, रा. मुंबई), भानूप्रताप सिंग (वय ३०, रा. झारखंड), प्रतीक पवार (वय २७, रा. उत्तर प्रदेश), विजय लालजी यादव (वय २३, रा. मुंबई) व इतर पाच ते सहा लोक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हॉटेल मालकाने हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी  फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमे इंटरटेनमेंट अँड मोशन पिक्चरकडील स्टाफ चित्रीकरणासाठी हिंजवडी येथे आले होते. त्यामुळे फिर्यादीच्या हॉटेलमध्ये ते थांबले होते. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडून रविवारी रात्री जेवण देण्यास उशिर झाला. या कारणावरून आरोपींनी चिनी मातीच्या प्लेटने  कर्मचाऱ्यांच्या हातावर मारले. आरोपींनी संगनमत करून हॉटेलच्या डायनिंग हॉलमधील १६ डिनर प्लेट तोडल्या, ११ खुर्च्या तोडून दोन रूममधील टीव्ही फोडले. तसेच बेड मॅट्रेस फाडल्या, बाथरूमच्या काचा फोडल्या. आठ पिलो कव्हर्स, चार बेडशीट फाडल्या, हॉटेलमधील इतर रूममध्ये देखील सुमारे ६५ हजार रुपयांचे नुकसान केले. फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी तसेच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी शिवीगाळ केली. त्यानंतर हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. रिसेप्शनवर काम करणाऱ्या मुलीशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस