Have you seen the viral advertisement in Pune? | पुण्यात व्हायरल झालेली ही जाहिरात तुम्ही पाहिलीत का ?
पुण्यात व्हायरल झालेली ही जाहिरात तुम्ही पाहिलीत का ?

पुणेपुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. पुणेकरांच्या  मिश्किल स्वभावाची चर्चा तर सगळीकडेच होते. पुणेरी पाट्याही सोशल मीडियावर हिट आहेत. अशीच एक जाहिरात सध्या पुण्यात गाजत असून सोशल मीडियावरही शेअर होत आहे. ही जाहिरात कोणत्याही राजकीय पक्षाची नसून चक्क एका क्लासची आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवडे आय एम सॉरी, आता कोथरूडला चव येणार अशा काही रंजक जाहिरातींच्या नंतर आता ही जाहिरात लक्ष वेधून घेत आहे. हडपसर भागातील एका कोचिंग क्लासने केलेली ही जाहिरात 'आमचे सर असे शिकवतात की गजनीलाही लक्षात राहील' अशी आहे. गंमत म्हणजे यात विद्यार्थ्यांशिवाय गजनीमधील आमीर खानचाही फोटो वापरला आहे. शॉर्ट टर्म मेमरी लॉस सारख्या आजारांने पिडीत असणाऱ्या तरुणाची गोष्ट सांगणारा आमिर खानचा गजनी चित्रपट चांगलाच गाजला होता.त्याचा वापर विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीसोबत जोडून अशी भन्नाट जाहिरात बनवली आहे. 


Web Title: Have you seen the viral advertisement in Pune?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.