शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्री भरणेंच्या १००च्या पावतीला हर्षवर्धन पाटलांच्या चिरंजीवांचे '५००'शेने प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 19:25 IST

राज्यमंत्र्यांनी शंभर रुपयाच्या दंड भरणे म्हणजे केवळ राजकीय स्टंट असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षाने केला होता..

इंदापूर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दोन दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यात एका कार्यक्रमात तोंडावरचा मास्क खाली आल्यामुळे स्वयंशिस्तीचा आदर्श वस्तुपाठ घालून देत १०० रुपयांची पावती फाडली होती. सरकारी नियमांचे उल्लंघन झाल्याचे कारण देत लासुर्णे ग्रामपंचायतीत स्वतःहून दंडाची रक्कम जमा केली होती. मात्र राजकारण म्हटलं की 'प्रत्युत्तर' हे ठरलेलेच असते. तोच कित्ता इंदापूरमध्ये पाहायला मिळाला आहे. दत्तात्रय भरणे यांचे राजकीय विरोधक व भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचे चिरंजीव राजवर्धन यांनी कार्यक्रमादरम्यान तोंडावरचा मास्क खाली आल्याचे कारण देत चक्क ५०० रुपयांची पावती फाडली आहे. आता 'ह्या' पावतीची इंदापूरच्या 'राजकीय' जोरदार चर्चा सुरु आहे.  

गेल्या काही दिवसांत इंदापूर तालुक्यात सांत्वण भेटीवरुन राजकारण रंगल्याचे अवघ्या तालुक्याने पाहिले होते. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यमंत्र्यांनी शंभर रुपयाच्या दंडाची आकारणी भरणे म्हणजे केवळ राजकीय स्टंट असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षाने केला होता. तर जशास तसे उत्तर देण्यासाठी मंगळवार ( दि. ३ नोव्हेंबर ) रोजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या बावडा या मुळ गावी कार्यक्रमानिमित्त गेलो असता माझाही मास्क घसरल्याचे कारण दाखवत बावडा ग्रामपंचायत कडे पाचशे रुपये दंडात्मक आकारणी रक्कम भरली.

राजवर्धन पाटील म्हणाले की, सामान्य जनता आणि राज्यमंत्री यांच्या दंडासंदर्भात दुजाभाव असल्याचे दोन दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईतून दिसून आले. याचा अर्थ सामान्य जनता आणि आपण कसे वेगळे आहोत हे दाखवून दिले. विरोधाला विरोध नाही मात्र स्वत: मंत्र्यांनीच कायदा मोडला तर तो कायदा जनतेला कसा काय लागू होतो ? याचे उत्तर प्रशासनाने व कायदा मोडणाऱ्याने द्यावे. मात्र मी जनतेसोबत असून सर्वांना असणारे नियम सारखेच आहेत आणि ते सर्वांनी पाळले पाहिजेत हेच मी या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे._____________

टॅग्स :Indapurइंदापूरharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा