शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

हर्षवर्धन पाटलांना ‘ ईव्हीएम ’ ची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 21:30 IST

संकल्पपत्र एवढ्या उशिरा आणून आणि त्यामुळे जुन्याच घोषणा करून भाजपाने निवडणुकीआधीच हार मान्य केल्याची स्थिती आहे.

पुणे : देशात नरेंद्र मोदी यांची लाट नसून मतदार त्यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे आघाडीसाठी राज्यात चांगले वातावरण असल्याचे सांगत काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी ईव्हीएम मशिनबाबत मात्र भीती व्यक्त केली आहे. ईव्हीएम यंत्रणेबाबत निवडणुकीत सतर्क राहावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी ईव्हीएम मशिनवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागपूर येथील उमेदवार नाना पटोले यांनी ईव्हीएमबाबत उच्च न्यायालयात तक्रार दिली आहे. त्याचा आधार घेत पाटील म्हणाले, निवडणुक पारदर्शकपणे पार पडणे आवश्यक आहे. आता कोणतीही लाट नाही. सरकारविषयी रोष आहे. संकल्पपत्र एवढ्या उशिरा आणून आणि त्यामुळे जुन्याच घोषणा करून भाजपाने निवडणुकीआधीच हार मान्य केल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता ईव्हीएम यंत्रणेवर बारकाईन लक्ष द्यावे लागले. त्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. ईव्हीएमबाबत तक्रार दिल्यास निवडणुक आयोगाने त्याची तातडीने दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबत विचारले असता पाटील यांनी त्याला बगल दिली. पक्ष सोडण्याबाबत त्यानांच विचारा असे सांगत त्यांनी बोलण्याचे टाळले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही यावेळी उपस्थित होते. त्यांनाही या मुद्यावर बोलण्यास नकार दिला.------------सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालीबारामती लोकसभा मतदारसंघातील काही जणांच्या अडचणी होत्या. दहा दिवसांपासून चर्चा सुरू होती. एक-एक प्रश्नाची उत्तरे मिळत गेली. त्यानंतर सोमवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. भोरमध्येही मेळावा घेण्यात आला आहे. सासवडमध्ये सर्वजण कामाला लागले आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे याच विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस