शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हर्षवर्धन पाटीलही बदलाच्या मार्गावर ?; जनसंकल्प मेळाव्यात राजकीय निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 20:55 IST

मागील तीन महिन्यांपूर्वी इंदापूर तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी व मतदारांनी आघाडी धर्माचे पालन करत, सुप्रिया सुळे यांना ७१ हजार मताची तालुक्यातून आघाडी देऊन लोकसभेत विजयी केले.

पुणे (इंदापूर) : मागील तीन महिन्यांपूर्वी इंदापूर तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी व मतदारांनी आघाडी धर्माचे पालन करत, सुप्रिया सुळे यांना ७१ हजार मताची तालुक्यातून आघाडी देऊन लोकसभेत विजयी केले. त्यावेळी लोकसभेला त्यांचे काम आम्ही करायचे व विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसने आपले काम करायचे असे स्पष्ट बोलणे झाले होते. असे असताना देखील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येवून ठेपली असताना, राष्ट्रवादी काँग्रेस दिलेला शब्द पाळताना दिसत नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील जनता ४ सप्टेंबरला जो निर्णय घेईल, तीच माझ्या राजकारणाची पुढची दिशा असेल,  असे स्पष्ट मत राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे.

इंदापूर शहरातील पाटील यांच्या निवासस्थानी संकल्प मेळाव्याची पूर्वतयारीची बैठक रविवार (दि. १) सप्टेंबर रोजी राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनीआयोजित केली होती. यावेळी पाटील बोलत होते. पाटील म्हणाले, काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी इंदापुरच्या जागेबाबत शरद पवार यांची भेट घेतली मात्र, त्यांनीही जागा सोडण्याबाबत स्पष्ट वक्तव्य केले नाही. यामुळे  बुधवारी (दि. ४) सप्टेंबर रोजी इंदापूर येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा जनसंकल्प मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात कार्यर्त्यांचा जो आग्रह राहील त्यानुसार निर्णय घेतला जाईल.   लोकसभा निवडणूक होऊन तीन महिने झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर जागा सोडणे संदर्भात निर्णय घेत नसल्याने इंदापूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील यांना सोडण्यात येणार नाही, असे राजकीय वतुर्ळात बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य यात्रेची सभा इंदापूर येथे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्देश स्पष्टपणे दिसून येत असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. इंदापूर तालुक्याचा विकास होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून इंदापूर विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी  काँग्रेस कार्यकर्ते करीत आहेत.     इंदापूर येथील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुपारी १ वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील  कार्यकर्त्यांशी विचार-विनिमय करून राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे हा मेळावा राज्यामध्ये राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील यांनी भाजपकडून करून लढवावी, असा आग्रह इंदापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणIndapurइंदापूरBJPभाजपाcongressकाँग्रेस