शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

हरिनाम गजराने अलंकापुरी दुमदुमली; ज्ञानेश्वरमहाराजांचा संजीवन समाधी सोहळा :

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 12:24 PM

पांडुरंगरायांच्या पादुका दाखल

ठळक मुद्देश्रीगुरू हैबतरावबाबा यांच्या पायरीचे पूजनपवमान अभिषेक, दुधारती, भाविकांच्या महापूजा, श्रींना महानैवेद्यअलंकापुरी परिसरात भाविकांनी केली गर्दी पदपथभाविकांसाठी खुले राहणार;मंदिर परिसर, इंद्रायणी घाट व शहरात सीसीटीव्ही यंत्रणा.

आळंदी : ज्ञानेश्वरमहाराज यांच्या ७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्यास हभप श्रीगुरू हैबतरावबाबा यांच्या पायरीपूजनाने हरिनामगजरात सुरुवात झाली. अलंकापुरी परिसरात भाविकांनी गर्दी केली. भक्तीमार्गावर हरिनाम गजरात राज्यातून भाविकांनी वाटचाल सुरू केली असून, हजारो भाविक अलंकापुरीत नामजयघोष करीत श्री पांडुरंगरायांच्या पादुका पालखीसह दाखल झाल्या आहेत. ज्ञानोबा-माऊली नामजयघोषात वारकरी भाविकांनी हैबतरावबाबा पायरीपूजनात बुधवारी (दि. २०) जयघोष केला .

हैबतरावबाबा यांचे वंशज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, ऋषीकेश आरफळकर परिवाराच्या वतीने प्रथा-परंपरांचे पालन करीत पायरीपूजन श्रींची आरती व महानैवेद्य झाला. याप्रसंगी श्रीरंग तुर्की, विजय कुलकर्णी व यज्ञेश्वर जोशी यांनी वेदमंत्रोच्चारात पौरोहित्य केले. श्रीगुरू हैबतरावबाबा यांच्या दिंडीतील वारकरी भाविकांनी अभंग आरती, मंदिर प्रदक्षिणा करून हरिनामगजरात सोहळ्यास प्रारंभ केला. हैबतरावबाबा ओवरीत आरती झाली. त्यानंतर दिंडीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर परंपरेने महाप्रसादवाटप करण्यात आले. तत्पूर्वी पालखी सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर परिवारातर्फे माऊलींच्या समाधीची पूजा करण्यात आली. यावेळी प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त डॉ. अभय टिळक, अजित कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी , गुप्तवार्ताचे मच्छिंद्र शेंडे, भाऊमहाराज फुरसुंगीकर, श्रींचे चोपदार कृष्णाजी रंधवेगुरुजी, दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष मारुती कोकाटे, माजी विरोधी पक्षनेते डी. डी. भोसले-पाटील, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, माजी नगरसेवक संतोष गावडे, ज्ञानेश्वर गुळूंजकर, माऊली दिघे, मानकरी दिनेश कुऱ्हाडे, बाळासाहेब कुºहाडे, संतोष मोझेमहाराज,  व्यवस्थापक माऊली वीर, श्रीधर सरनाईक, कृष्णाजी डहाके, दिंडीकरी, भाविक, नागरिक उपस्थित होते. मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्ते मानकऱ्यांना नारळ प्रसाद वाटप झाले.     ७२४ व्या संत ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी दिन सोहळ्याच्या सुरुवातीनिमित्त पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांच्या महापूजा, श्रींना महानैवेद्य झाला. वीणामंडपात योगीराज ठाकूर यांच्यावतीने कीर्तन, धूपारती, हभप बाबासाहेब आजरेकर यांच्यातर्फे कीर्तनसेवा, मंदिर प्राकारासह महाद्वारातील श्रीगुरू हैबतरावबाबा यांच्या पायरीपुढे हरिनामगजरात जागर आदी धार्मिक कार्यक्रम झाले. भाविक नागरिकांनी गर्दी करून श्रवणसुखाचा लाभ घेतला. आळंदीत हरिनाम सोहळ्यास सुरुवात झाल्याने आळंदीत भक्तीउत्साह दिसत आहे. इंद्रायणी नदी परिसर माऊली मंदिर आदी ठिकाणी हरिनामगजराला उधाण आले आहे. श्री ज्ञानेश्वरी पारायणास विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज धर्मशाळेत दिलीपमहाराज ठाकरे यांच्या कीर्तनसेवेने;तसेच आळंदीत परंपरेने सुरुवात झाली आहे. मंदिरात अजानवृक्षाच्या छायेत भाविकांचा प्रतिसाद मोठा मिळत असल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांच्यासह सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात प्रथा-परंपरांचे पालन करीत धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत.........पदपथभाविकांसाठी खुले राहणार; मुख्याधिकारी समीर भूमकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सुलभ शौचालये खुली,  मंदिर परिसर, इंद्रायणी घाट व शहरात सीसीटीव्ही यंत्रणा.............सतर्क राहण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहनभाविकांची नगरप्रदक्षिणा सुखकर; भाविकांत समाधान.यात्राकाळात दिंडीकरी (पासधारक), पाण्याच्या टँकरसह अत्यावश्यक सेवा वाहनांना प्रवेश........४आळंदीतील कार्तिकी यात्रेच्या तयारीत नियोजनाप्रमाणे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. यात्रेस राज्य परिसरातून लाखो भाविक आळंदीत येत असतात. भाविक, नागरिक यांची सुरक्षा आणि भाविकांना अल्प काळात दर्शन देण्याचे नियोजन यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. मंदिरावर लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवमीदिनानिमित्त गुरुवारी (दि. २१) परंपरेने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमात श्रींना पवमान अभिषेक व दुधारती, भाविकांच्या महापूजा, महानैवेद्य, वीणामंडपात बाबासाहेब देहूकर यांच्या कीर्तनसेवेनंतर धूपारती व त्यानंतर वासकरमहाराज यांच्यावतीने परंपरेने कीर्तनसेवा रुजू होणार आहे. श्रींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा होणार आहे. भाविकांना महाप्रसाद चहा, खिचडीचे वाटप सुरू झाले. भाविकांसाठी लाडूप्रसाद व शेंगदाणा लाडूप्रसादनिर्मितीचे काम मार्तंड अप्पा ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आळंदीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी सांगितले.  ..........श्री पांडुरंगरायांच्या पादुका पालखीचे आळंदीत श्रींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी हरिनाम गजरात आगमन झाले. तत्पूर्वी थोरल्या पादुका देवस्थानच्या वतीने पुणे-आळंदी मार्गावर स्वागत करण्यात आले. श्रींच्या पालखी सोहळ्यासमवेत दिंडीसह विठ्ठलमहाराज वास्कर, नामदेवमहाराज वास्कर यांच्यासह मान्यवरांचा श्रीफळ प्रसाद देऊन थोरल्या पादुका देवस्थानचे अध्यक्ष विष्णू तापकीर यांनी स्वागत व सत्कार केला......यावेळी सोहळ्यासमवेत विठ्ठलमहाराज वास्कर दादा, नामदेवमहाराज वास्कर, ऋषीकेशमहाराज वास्कर आदी उपस्थित होते. या वर्षी रथाच्या पुढे १५, तर रथामागे १० दिंड्या सहभागी झाल्या आहेत. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण व कर्नाटकातील वारकरी श्री पांडुरंगरायांच्या पादुका पालखी सोहळा पायी वारीत सहभागी झाले आहेत. यात सुमारे १६ हजारांवर वारकरी भाविक प्रवास करीत आहेत.   

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर