शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पण हैराण! घराबाहेर पडण्यासाठी पुणेकरांची "भन्नाट" कारणे ; एका महिन्यात १५ हजार गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 15:44 IST

कोणतेही कारण नसताना लोक घराबाहेर पडण्यासाठी वेगवेगळी आणि गमतीशीर कारणे

ठळक मुद्देशहरात १ हजारांहून अधिक कोरोना बाधितांची संख्या

पुणे : शहरातील कोरोना विषाणूने बाधित झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरात १ हजारांहून अधिक कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. शहरातील मध्य वस्तीतील सर्व भागात दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत असले तरी लोकांना त्याचे गांभीर्य नाही. कोणतेही कारण नसताना लोक घराबाहेर पडण्यासाठी वेगवेगळी आणि गमतीशीर कारणे देत असतात. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून २४ मार्च ते २३ एप्रिल या एका महिन्यात संचारबंदीचा भंग करणार्‍या १५ हजार ४४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे पोलिसांनी या महिन्यात अशा लोकांवर मोठी कारवाई केली आहे. विनाकारण रस्त्याबाहेर पडणे, मॉर्निग वॉकला बाहेर पडणे, मास्क न वापरणे अशा वेगवेगळ्या प्रकारे संचारबंदीचा भंग करणार्‍या १५ हजारांहून अधिक जणांवर पोलिसांनी १८८ अंतर्गत कारवाई केली आहे. तर वाहनवर फिरणार्‍यांवर कारवाई करुन दररोज सुमारे १ हजार वाहने जप्त केली जात आहे. आतापर्यंत जवळपास ३४ हजार ४२ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर, ३७ हजार ५८३ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.२३ एप्रिलला एका दिवशी १८८ कलमाखाली ५६१ जणांवर कारवाई करण्यात आली. १ हजार २० वाहने जप्त केली गेली. तसेच मॉर्निंग वॉक करणार्‍या २०७ जणांवर कारवाई केली गेली. मास्क न वापरणार्‍या ४७ जणांवर कारवाई झाली़ असून ९७० जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्येने १ हजारांचा टप्पा गाठला असला तरी किरकोळ कारणामुळे घराबाहेर पडणार्‍यांची संख्या काही केल्या कमी होत नाही....गरज असलेल्यांना मिळते मदत...काही जणांना खरोखरच अडचणी असतात अशांना पोलिसांकडून तातडीने मदतही पुरविली जाते. गेल्या काही दिवसात शहरातील ३२२ ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांच्या भरोसा सेलमधील ज्येष्ठ नागरिक कक्षाने मदत केली.* वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडणार्‍या, इतर जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी मागणार्‍यांना तातडीने पास दिला जातो......लॉकडाऊन का पाळले पाहिजे..शहराच्या ५ क्षेत्रीय कार्यालयात ६० टक्के रुग्ण असले तरी यापुढे इतर भागात कोथरुड, वारजे, पाषाण, गोखलेनगर, एरंडवणे या भागात कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत कमी आहे. या भागात बाधित भागातून लोक गेले अथवाया भागातील लोक बाधित भागात गेले तर आतापर्यंत नसलेल्या भागातही कोरोना विषाणु पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ज्या भागात बाधितांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यांनी आपल्या भागात इतर भागातून कोणी येऊ नये अथवायेथून कोणी बाधित भागात जाऊ नये, यासाठी जास्त खबरदारी घेण्याची आवश्यकताआहे.............आमच्या डिश वॉशरला कॅम्पातच डिटर्जंट मिळते...आमच्या घरी विशेष डिश वॉशर मशीन आहे़ त्यासाठी चांगले डिटर्जंट हे कॅम्पातच मिळते़ त्यामुळे ते आणण्यासाठी कॅम्पात जाण्यास परवानगी द्यावी,अशी मागणी एका उच्च शिक्षित पुणेकरांनी पोलिसांकडे केली होती़ तर आणखी एकाने आम्हाला कॅम्पातील एका दुकानातील विशिष्ट खाद्य पदार्थ खाण्याचीसवय आहे़ ते आणण्यासाठी जाण्यास परवानगी द्या, अशा विचित्र आणिपरिस्थितीचे कोणतेही गांभीर्य नसलेल्या मागण्या पुणेकरांनी पोलिसांकडेकेल्या होत्या़ अर्थात या मागण्या फेटाळण्यात आल्या, हे वेगळे सांगायलानको..

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस