शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

लग्न लागण्यापूर्वीच आरोपीच्या हातात बेड्या; पाच महिन्यापासून होता फरार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 20:08 IST

खुनाच्या प्रयत्नातील पाच महिन्यापासून फरारी असलेला आरोपी लग्न करण्यासाठी मंदिरात आला होता

लोणी काळभोर : खुनाच्या प्रयत्नातील पाच महिन्यापासून फरारी असलेला आरोपी लग्न करण्यासाठी मंदिरात आला. परंतु लग्न लागण्यापूर्वीच त्याच्यासहित साथीदार अशा दोघांना लोणी काळभोरपोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी अमित बालाजी सोनवणे (वय २६) व अभिषेक संजय पवार (वय. २२, दोघेही रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) या दोघांना ताब्यात घेतले आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २१ जानेवारी रोजी सायंकाळी माळी मळा, महात्मा फुले नगर, लोणी काळभोर येथे श्रीनिवास नानासाहेब जगताप (वय ३०, रा. माळीमळा, लोणी काळभोर) यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. अमित सोनवणे, अभिषेक पवार व त्यांच्या १० ते १२ साथीदार दुचाकीवर आले. त्यांनी हातामध्ये लोखंडी कोयते फिरवून दहशत निर्माण करत फिर्यादी यांना जीवे मारण्याचे उद्देशाने लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला करून जखमी केले होते.             पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी ११ व १२ जून दरम्यान पुणे शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले होते. फरारी आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार राजेश दराडे व बाजीराव वीर यांना त्यांच्या गोपनीय खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, खुनाचा प्रयत्न केलेल्या गुन्हयातील ५ महिन्यापासून फरारी असलेला अमित सोनवणे हा थेऊर येथे महातारीआई मंदीरात प्रेमविवाह करण्याकरीता त्याच्या साथीदारांसह येणार आहे.

वरिष्ठांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक राजु महानोर आणि त्यांचे पथक सदर ठिकाणी वेषांतर करून जाऊन थांबले. नवरा नवरीच्या लग्न पोशाखात काही जण चारचाकीतून महातारी आईच्या मंदिराच्या आवारात आले. पोलीस पथकाची चाहुल लागल्याने लग्न पोशाखातील इसम व त्याचा साथीदार तेथून पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करुन अमित सोनवणे व अभिषेक पवार यांना थोडयाच अंतरावर पकडले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे करीत आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अप्पर आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सुभाष काळे ( गुन्हे ) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली आहे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकmarriageलग्न