शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

लघुपटातून उलगडणार हमीद दलवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 4:01 AM

मुस्लिम समाजाच्या उत्थानासाठी लढा उभारणारे, संघटनेच्या माध्यमातून समानतेचे, सामाजिक सुधारणेचे, धर्मनिरपेक्षतेचे बीज पेरणारे हमीद दलवाई सर्वांनाच परिचित आहेत. मात्र, त्यांच्यातील चिंतनशील लेखक, संवेदनशील माणूस असे विविधांगी पैलू तरुण पिढीला फारसे माहीत नाहीत.

पुणे - मुस्लिम समाजाच्या उत्थानासाठी लढा उभारणारे, संघटनेच्या माध्यमातून समानतेचे, सामाजिक सुधारणेचे, धर्मनिरपेक्षतेचे बीज पेरणारे हमीद दलवाई सर्वांनाच परिचित आहेत. मात्र, त्यांच्यातील चिंतनशील लेखक, संवेदनशील माणूस असे विविधांगी पैलू तरुण पिढीला फारसे माहीत नाहीत. सामाजिक कार्यकर्त्या हमीदभार्इंमधील ‘आपला माणूस’ लघुपटातून सर्वांसमोर उलगडणार आहे. ‘हमीद : द अनसंग ह्यूमॅनिस्ट’ या लघुपटाची निर्मिती ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी केली आहे. ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा, हमीद दाभोलकर, अमृता सुभाष यांच्या संभाषणातून हमीदभार्इंचे विविध पैलू उलगडणार आहेत. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या मुलाखतीचा लघुपटात समावेश आहे.हमीद दलवाईंनी आपल्या लेखनातून वास्तव चित्रण केले. त्यांचे उत्कट लेखन अनुभवातून आलेले होते. हेच चैतन्यशील व्यक्तिमत्त्व ‘हमीद : द अनसंग ह्यूमॅनिस्ट’ या लघुपटातून जाणून घेता येणार आहे.हमीदभार्इंचा सहवास लाभलेल्या दिग्गजांच्या मुलाखती यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कोकणातील मिरजोळी (ता. चिपळूण) या हमीद दलवाई यांच्या जन्मगावापासून या लघुपटाला प्रारंभ होतो. हमीद दलवाई यांचा व्यक्ती, लेखक, कार्यकर्ता आणि समाजसुधारक अशा वेगवेगळ्या पैलूंवर लोकांच्या छोटेखानी मुलाखतींतून प्रकाश टाकण्यात आला आहे. नसिर यांच्यासह अमृता सुभाष आणि क्षितीश यांनी निवेदकाची भूमिका साकारली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सय्यदभाई, डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यासह दलवाई यांचे बंधू खासदार हुसेन दलवाई यांनी हमीद दलवाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले आहेत, अशी माहिती ज्योती सुभाष यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.नव्या पिढीला परिचय व्हावादोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे हमीद दलवाई यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तो मेहरुन्निसा दलवाई यांनी स्वीकारला होता. या क्षणाचे चित्रीकरण या लघुपटात समाविष्ट करण्यात आले आहे,ज्योती सुभाष म्हणाल्या, या कार्यक्रमाने मी भारावून गेले. त्या भारावलेपणातच हमीदभाई यांचे साहित्य पुन्हा एकदा वाचून काढले. या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा नव्या पिढीला परिचय व्हावा या उद्देशातूनच लघुपटाची निर्मिती केली आहे.खरतर या विषयावर मला चित्रपटच करायचा होता आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील माझा सहाध्यायी नसिरुद्दीन याने हमीद दलवाई यांची भूमिका करावी, अशी इच्छा होती. निर्मितीचा माझा हा पहिलाचप्रयत्न असल्याने ६४ मिनिटे कालावधीचा लघुपट करण्याचे ठरविले.ओंकार अच्युत बर्वे यांनी दिग्दर्शन साहाय्य केले आहे. नसिरुद्दीन शहा यांच्यासह प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष, डॉ. हमीद दाभोलकर आणि क्षितिश दाते यांनी या लघुपटासाठी निवेदक म्हणून काम केले आहे.योगेश राजगुरू यांनी छायालेखनाचे, क्षमा पाडळकर यांनी संकलनाचे, विपुल पॉल यांनी ध्वनिसंयोजनाचे काम केले असून, लघुपटाला नरेंद्र भिडे यांचे पार्श्वसंगीत आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे प्रेक्षागृह येथे रविवारी (१७ जून) संध्याकाळी साडेसहा वाजता या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणेcinemaसिनेमा