शहरं
Join us  
Trending Stories
1
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
2
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
3
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
4
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
5
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
6
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
7
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
8
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे
9
"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, आम्ही फक्त..." केजरीवालांचे मोठे विधान
10
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
11
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
12
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
13
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
14
मुंबई मनपानं नोटीस बजावली, तरीही २९ महाकाय होर्डिंग जसेच्या तसे!
15
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
16
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
17
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
19
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
20
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'

पुण्यातील निम्मी शाळकरी मुलं ‘अनफिट’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 6:00 AM

विद्यार्थ्यांचे वजन व उंचीच्या प्रमाणात नसून अनेक विद्यार्थ्यांची शारीरिक हालचाल कमी होत असल्याचे स्पष्ट

ठळक मुद्दे देशातील २२ राज्यांतील २५० शहरांमधील १ लाख ४९ हजार ८३३ विद्यार्थ्यांची पाहणी ३६४ शाळांमधील ७ ते १७ वर्षे या वयोगटातील विद्याथ्यांच्या बॉडी मास इंडेक्सची तपासणी

पुणे : शहरातील विविध शाळांमधील जवळपास निम्मी मुले व मुली शारीरिकदृष्ट्या अनफिट असल्याचे एका सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे. या विद्यार्थ्यांचे वजन व उंचीच्या प्रमाणात नसून अनेक विद्यार्थ्यांची शारीरिक हालचाल कमी होत असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. यामध्ये सुमारे २ हजार विद्यार्थ्यांची पाहणी करण्यात आली आहे. स्पोर्ट्झ व्हिलेज स्कुल या संस्थेतर्फे मागील दहा वर्षांपासून देशभरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या फिटनेसचे सर्वेक्षण केले जात आहे. यावर्षी देशातील २२ राज्यांतील २५० शहरांमधील १ लाख ४९ हजार ८३३ विद्यार्थ्यांची पाहणी करण्यात आली. देशातील ३६४ शाळांमधील ७ ते १७ वर्षे या वयोगटातील विद्याथ्यांच्या बॉडी मास इंडेक्स (बीएमआय)ची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये प्रत्येक दोनपैकी एका मुलाचे वजन उंचीच्या प्रमाणात नसल्याचे आढळून आले. तसेच प्रत्येक तीनपैकी एका मुलाच्या शरीरात पुरेशी लवचिकता नव्हती. तर सहा मुलांमागे एका मुलाच्या उदराच्या स्नायूंमध्ये सुयोग्य ताकद नव्हती. हे प्रमाण पुणे शहरातील विद्यार्थ्यांबाबत आढळले आहे. संस्थेतर्फे पुण्यातील १ हजार ९४६ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये १०५९ मुली व ८८७ मुलांचा समावेश होता. या सर्वेक्षणामध्ये ५० टक्के विद्यार्थ्यांचा बीएमआय अनारोग्यदायी असल्याचे दिसून आले. मुली व मुलांचा बीएमआय सारखा आहे. लवचिकतेच्या बाबतीत मुली सरस ठरल्या आहेत. एकुण विद्यार्थ्यांपैकी ७९ टक्के मुली व ६८ मुले लवचिक आढळून आली आहेत. शारिरिक हालचालींच्या क्षमते(एरोबिक)मध्ये एकुण ६४ टक्के विद्यार्थी अनारोग्यदायी आहेत. त्यामध्ये मुलींचे प्रमाण केवळ २२ टक्के एवढे आहे. तर मुलांमध्ये हे प्रमाण दुप्पट दिसून आले. कंबरेच्या वरील भागातील ताकदीमध्ये ५६ टक्के विद्यार्थी अनारोग्यदायी तर पायाच्या ताकदीमध्ये ६६ टक्के विद्यार्थी अनारोग्यदायी आढळले. याविषयी बोलताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौमिल मजुमदार म्हणाले, मुल शारीरिक हालचालींमध्ये किती वेळ घालवते याचा थेट संबंध शरीराच्या वरच्या भागातील ताकद, बीएमआय आणि एरोबिक क्षमतांशी आहे. त्यासाठी मुलांना खेळण्यासाठी व शिकण्यासाठी समान अवधी मिळायला हवा.-------------‘बीएमआय’मुळे मुले कुपोषित आहेत किंवा नाही, त्याचे प्रमाण किती आहे याची माहिती मिळते. पण संबंधित मुले कोणत्या भागातील आहेत, त्यांची कौटूंबिक स्थिती, सामाजिक पार्श्वभुमी, त्यांना मिळणारा आहार यागोष्टी महत्वाच्या असतात. त्यामुळे सर्वेक्षणाचे निष्कर्ष सरसकट सर्व मुलांबाबतीत तेच असू शकतील, असे नाही. - डॉ. आरती किणीकर, बालरोग विभाग, ससून रुग्णालय 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यSchoolशाळाStudentविद्यार्थी