शहरं
Join us  
Trending Stories
1
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
2
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
4
‘लिव्हिंग विल’ पुनर्प्राप्तीसाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, उच्च  न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
5
Cidco Lottery 2025: अक्षय तृतीयेला सिडको आणणार १२ हजार घरे?
6
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
7
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
8
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
10
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
11
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
12
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप
13
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
14
मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक
15
विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?
16
मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब
17
वक्फ मालमत्तांचा दर्जा ५ मेपर्यंत रद्द होणार नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला हमी
18
अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही
19
शेअर बाजाराचा चौकार, ६.३७ टक्क्यांनी वाढला सेन्सेक्स; सलग चौथ्या दिवशी बाजारात वाढ
20
चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल

भारताच्या नकाशातून अर्धे काश्मीर गायब; CICTAB च्या कार्यक्रमात मोठी चूक

By दत्ता लवांडे | Updated: February 6, 2025 15:39 IST

CICTABच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या कार्यक्रम पत्रिकेतील प्रकार; पाकिस्तानात दाखवण्यात येणारा नकाशा पत्रिकेमध्ये

- दत्ता लवांडेपुणेआंतरराष्ट्रीय कृषी बँकिंग कोऑपरेशन आणि प्रशिक्षण केंद्र (CICTAB) यांच्याकडून पुण्यात एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. या पत्रिकेतील सदस्य देशांच्या नकाशामध्ये असलेल्या भारतीय नकाशामध्ये चूक झाली असून जम्मू काश्मिरचा अर्धा भाग गायब करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, CICTAB या संस्थेच्या वतीने आणि केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात "सहकाराच्या माध्यमातून समृद्धी : डिजीटल इनोव्हेशन आणि मुल्यसाखळी" ही आंतरराष्ट्रीय परिषद १३ फेब्रुवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत पार पडणार आहे. या परिषदेमध्ये विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहे. 

CICTAB या संस्थेच्या सदस्य देशांमध्ये भारत, बांग्लादेश भूतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका या देशाचा सामावेश आहे. कार्यक्रम पत्रिकेमध्ये सर्व देशांचे नकाशे दाखवले असून भारताच्या नकाशामधून जम्मू आणि काश्मिरचा अर्धा भाग गायब करण्यात आला आहे. या पत्रकात वापरण्यात आलेला भारतीय नकाशा हा पाकिस्तानात दाखवला जात असल्यामुळे आता यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

काय आहे CICTAB?कृषी बँकिंगमध्ये काम करण्यासाठी जानेवारी १९८३ मध्ये सरकारने स्थापन केलेली ही एक स्वायत्त संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय हे पुणे विद्यापीठाजवळ असलेल्या वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM) येथे आहे. ही संस्था कृषी बँकिंगच्या संदर्भातील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते. त्याच संस्थेने हे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र