पुण्यात डुकरांच्या टोळीचा सोसायटीत धुमाकूळ  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 06:40 PM2019-07-30T18:40:37+5:302019-07-30T19:41:48+5:30

एका सोसायटीमध्ये दुपारी डुकरांच्या टोळीने अतिक्रमण केले...

Half hour pigs problems create in the society at Pune | पुण्यात डुकरांच्या टोळीचा सोसायटीत धुमाकूळ  

पुण्यात डुकरांच्या टोळीचा सोसायटीत धुमाकूळ  

googlenewsNext

पुणे :  सोपाननगर येथे एका सोसायटीमध्ये दुपारी डुकरांच्या टोळीने अतिक्रमण केले. तसेच सोसायटीमधील नागरिकांनी त्यांना हटकल्याने एक डुक्कर याचदरम्यान घरामध्ये घुसले. या डुकराने घरामध्ये अर्ध्यातासापेक्षा जास्त वेळ धुमाकूळ घातला. या डुकरांना सोसायटीतील नागरिकांची धावपळ केली. अखेर पालिकेच्या कर्मचा-यांनी या डुक्कराला पकडले.त्यानंतर डुकरांचा हैदोस थांबला.
 पुणे महापालिकेने शहराच्या हद्दीतील मोकाट डुकरांच्या नियंत्रणासाठी जवळपास ७३ लाख ६० हजार रुपयांची तरतूद केली आहे. एका खासगी कंपनीला तीन वर्षासाठी डुकरे पकडण्याचा ठेका दिला आहे.वडगावशेरी, कल्याणीनगर, सोपाननगर, विमाननगर, चंदननगर, खराडी, गणेशनगर, लोहगाव या भागामध्ये मोकाट डुक्करांची संख्या प्रंचड वाढली आहे. ही मोकाट डुक्कर उपद्रव करत आहे. नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करतात. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बैठी घरे आहेत. या बैठकी घरामध्ये डुक्कर घुसतात.यामध्ये सेवकवर्ग, वाहन, इंधन, वाहतुक खर्चासह डुकरे उचलणे व त्याची विल्हेवाट लावण्याचे काम समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, तरी डुकरांची समस्या संपली नाही. उलट वाढतच चालली आहे. यामुळे डुक्कर पकडणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे काम फक्त कागदोपत्री होत असल्याचा आरोप नागरीक करत आहे.
सोपाननगर मधील नागरीकांनी तक्रार केल्यांनतर लगेच डुक्कारांना पकडले. नागरीकांच्या तक्रारीनंतर डुक्करांवर तत्काळ कारवाई केली जाते. डुक्करांच्या लहान पिल्लू आणि त्याच्या आईला पकडता येत नाही. डुक्कर पकडण्यासाठी एकच गाडी आहे. दिवसभरामध्ये फक्त तीस डुक्करांना पकडता येते. यामुळे कारवाईला थोडा वेळ लागतो अशी माहिती आरोग्य निरीक्षक अधिकारी माने यांनी दिली.

Web Title: Half hour pigs problems create in the society at Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.