शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा निम्म्यावर

By admin | Updated: August 19, 2015 00:11 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्म्यावरच असल्याने पुणे शहरामध्ये वर्षभर पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्म्यावरच असल्याने पुणे शहरामध्ये वर्षभर पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पाण्याबाबतची परिस्थिती पालकमंत्री गिरीष बापट यांच्या निर्दशनास आणून दिली असून येत्या शनिवारी, २२ आॅगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाईल.आॅगस्ट अर्धा संपल्यानंतरही अद्याप पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणीसाठ्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. जिल्ह्यामध्ये सरासरीच्या ६० ते ७० टक्के इतकाच पाऊस आतापर्यंत पडला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे पानशेत धरण ६४ टक्के, वरसगाव ४८ टक्के, टेमघर ४१ टक्के तर खडकवासला २७ टक्के भरलेले आहे. वस्तुत: आॅगस्ट मध्यावर ही धरणे १०० टक्क्यांपर्यंत भरलेली असतात. त्यामुळे पाणीकपात करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.खडकवासला प्रकल्प सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये शहराला किती पाणी द्यायचे याचा निर्णय घेतला जातो, येत्या २२ आॅगस्ट रोजी या समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला जिल्हयातील सर्व आमदार, पुणे महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित असतात.पानशेत, खडकवासला, वरसगाव, टेमघर या धरणातून पिण्याबरोबरच शेतीसाठी पाणी सोडले जाते. मात्र पाणीसाठा कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतीचे पाणी कमी करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. उर्वरित दीड महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला तरच या पाणीकपातीचा फेरविचार करता येऊ शकेल अन्यथा वर्षभर पाणीकपातीला तोंड देण्याची तयारी पुणेकरांना ठेवावी लागणार आहे.