उत्तरेकडील दाट धुक्याचा विमान सेवेला फटका; पुण्यातून एकूण नऊ विमाने रद्द

By अजित घस्ते | Published: December 29, 2023 04:48 PM2023-12-29T16:48:58+5:302023-12-29T16:49:47+5:30

धुक्यामुळे दोन दिवसांपासून पुणे दिल्ली आणि दिल्ली - पुणे विमानांचे वेळापत्रक बिघडल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे

Hail haze in the north affects flight services A total of nine flights from Pune have been cancelled | उत्तरेकडील दाट धुक्याचा विमान सेवेला फटका; पुण्यातून एकूण नऊ विमाने रद्द

उत्तरेकडील दाट धुक्याचा विमान सेवेला फटका; पुण्यातून एकूण नऊ विमाने रद्द

पुणे : उत्तरेकडील दाट धुक्याचा प्रभाव वाढला असल्याने पुणे ते दिल्ली विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही विमानांना एक तासांपर्यंत उशीर झाला असल्याने सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ही विमान प्रवाशांना फटका बसला. गेल्या दोन दिवसांपासून दाट धुके पडत आहे. त्यामुळे विमानांच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. 

दिल्लीमध्ये पहाटे पासून ते दुपारपर्यंत धुक्याचा परिणाम राहत आहे. त्यामुळे दिल्ली वरून पुणे येते येणारी वेगवेगळ्या कंपन्याची ५ विमाने धुक्क्यामुळे रद्द करण्यात आली. तर पुणे वरून दिल्ली, अमृतसर, चंडीगडकडे जाणारे ३ विमान रद्द करण्यात आली आहेत. धुक्यामुळे दोन दिवसांपासून पुणे दिल्ली आणि दिल्ली - पुणे विमानांचे वेळापत्रक बिघडल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

पुण्यातून दिल्लीसाठी सर्वाधिक विमाने धावतात. या मार्गावर वेगवेगळ्या कंपन्याच्या साधारण १५ पेक्षा जास्त विमान सेवा आहेत. पण, दोन दिवसांपासून सकाळच्या टप्प्यातील काही विमानांना उशीर होत आहे. तर, काही विमाने रद्द होत आहेत. यामध्ये दिल्ली ते पुणे वरून येणारे ५ विमाने तर पुणे ते दिल्ली कडे जाणारी ३ एकूण ८ विमाने खराब हवामानामुळेच ही विमाने रद्द झाली आहेत. त्याच बरोबर अमृतसर, चंदीगड,लखनऊ आणि हैदराबाद, गोवा,अहमदाबाद कडे जाणारी प्रत्येकी एक विमान रद्द झाले. त्यामुळे कामाच्या निमित्ताने दिल्लीला जाणाऱ्या व दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या नागरिकांच्या खूपच अडचणी झाल्या आहेत. अनेकांच्या महत्वाच्या मिटिंग व कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे मनस्ताप देखील सहन करावा लागला.

Web Title: Hail haze in the north affects flight services A total of nine flights from Pune have been cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.