हडपसर: आग आटोक्यात येत असताना ज्वाळांमुळे डीपीने घेतला पेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 04:32 PM2021-11-09T16:32:50+5:302021-11-09T16:37:32+5:30

हडपसर : पहाचेच्या सुमारास लागलेल्या आगीत पिसोळी येथील प्लायवुडचे गोदाम जळून खाक झाले. आगीच्या ज्वाळांनी शेजारी असलेल्या महावितरणच्या डीपीनेही पेट ...

hadapsar flames engulfed the electric dp | हडपसर: आग आटोक्यात येत असताना ज्वाळांमुळे डीपीने घेतला पेट

हडपसर: आग आटोक्यात येत असताना ज्वाळांमुळे डीपीने घेतला पेट

googlenewsNext

हडपसर: पहाचेच्या सुमारास लागलेल्या आगीत पिसोळी येथील प्लायवुडचे गोदाम जळून खाक झाले. आगीच्या ज्वाळांनी शेजारी असलेल्या महावितरणच्या डीपीनेही पेट घेतला आहे. आज (मंगळवार, ९ नोव्हेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास लागलेली आग सकाळी सहाच्या सुमारास आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.

गोडावूनमध्ये फ्लायवुडच्या थप्प्या लावल्या होत्या. चारही बाजूने लाकडी प्लायऊड असल्याने आगीने उग्र रूप धारण केले होते. आग लागलेल्या गोदामाच्या बाजूला आजूबाजूला इतर गोदामे असल्याने आग नियंत्रणात आणताना अग्निशामक दलाच्या जवानांची दमछाक झाली. शेजारी महावितरणचा हाय होल्टेजचा डीपी आहे. आगीच्या झळा त्या डीपीपर्यंत पोहोचल्या आणि काही क्षणातच डीपीनंही पेट घेतल्याचे समजताच पथकातील काही जवान तात्काळ डीपीची आग आटोक्यात आणण्यासाठी धावले. त्यांनी तातडीने डीपीला लागलेली आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.

कात्रज, कोंढवा, हडपसर, मुख्य अग्निशामक केंद्र व पीएमआरडीच्या असे एकूण १४ अग्निशमनच्या गाड्या आणि टँकर घटनास्थळी दाखल झाल्या होते. इतर गोडाऊनला आग लागू नये, म्हणून अग्निशामक दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून सकाळी साडेसहा वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली. आग नियंत्रणात आली असून, कुलिंगचे काम सुरू होते. आगीचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी वेळीच गर्दी हटविल्यामुळे अग्निशमनच्या जवानांना आग आटोक्यात आणता आली.

Web Title: hadapsar flames engulfed the electric dp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.