शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
नागपंचमी २०२५: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

" फिजिकल डिस्टन्स आड आले नाहीतर मिठी मारली असती..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 13:03 IST

ज्या भागात आपण लहानाचे मोठे झालो तिथे पोलीस कडेकोट बंदोबस्त ठेऊन आपल्या सुरक्षेसाठी झटत आहेत. ही जाणीव ठेवून सुरुवातीला त्यांना आल्याचा, तुळशीचा चहा देण्यास सुरुवात केली...

ठळक मुद्दे शेफ आणि सेलिब्रिटी पराग कान्हेरे यांचा उपक्रम आल्याच्या, तुळशीचा चहा आणि वडापावसाठी पोलिसांकडून आभार

युगंधर ताजणे -पुणे : लॉकडाऊन झाल्याचे कळल्यानंतर जे दिवसरात्र आपल्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी काही करायला हवे ही भावना स्वस्थ बसू देईना. ज्या भागात आपण लहानाचे मोठे झालो तिथे पोलीस कडेकोट बंदोबस्त ठेऊन आपल्या सुरक्षेसाठी झटत आहेत. ही जाणीव ठेवून सुरुवातीला त्यांना आल्याचा, तुळशीचा चहा देण्यास सुरुवात केली. तो चहा पिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान याची गोष्टच वेगळी आहे. यानंतर पोलिसासाठी खास पॅकेजीग वडापाव देऊ लागलो. तेव्हा एका पोलिसाने 'साहेब , सोशल डिस्टन्सचे बंधन आहे नाहीतर, कडकडीत मिठी मारून आपल्याला धन्यवाद दिले असते.' अशी भावना व्यक्त केली. अजून काय हवे होते ? बिग बॉस फेम आणि शेफ पराग कान्हेरे आपल्या नवीन उपक्रमाबद्दल बोलत होते. झोन 3 मध्ये येणारे सहायक पोलिस आयुक्तालय, तसेच सिंहगड, अलंकार, दत्तवाडी, वारजे, कोथरूड, उत्तमनगर या भागातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांसाठी पराग कान्हेरे आणि त्यांचे सहकारी यांनी वडापावचे वितरण सुरू केले आहे. पोलिसांकडून याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमासाठी त्यांना अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी राजेश तटकरे, कल्पना जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच झोन 3 च्या पोलीस उपआयुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडून वडापाव वितरणाची परवानगी घेतली. त्यांनी सांगितलेले नियम आणि काळजी यांचे काटेकोर पालन करून ही सुविधा पोलिसांना देण्यात आली आहे. याविषयी अधिक माहिती देताना कान्हेरे म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून वडापाव वितरण करण्यास सुरुवात केली आहे. एका दिवसाला साधारण 500 वडापाव आम्ही देत आहोत. खरं तर या दिवसांत आम्हाला आमचा 'बिग वडापाव' नावाने नवीन सुरुवात करायची होती. मात्र लॉकडाऊनमुळे ते काम शक्य झाले नाही.

दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत वडापावचे वितरण करण्यात येते. सुरुवातीला इतर झोनचा देखील विचार केला होता. मात्र तेथील पोलिसांची संख्या, तसेच त्या भागातील सद्यस्थिती याच्या काही मयार्दा असल्याने झोन 3 मध्ये काम सुरू केले. यापुढील दिवसांत पिंपरी चिंचवड भागात देखील पोलिसांना ही सुविधा देण्यात येणार आहे. या कामात कुंदन देवघरे, बळीराम चव्हाण, दीपेश निरवार, महेश सुरवसे आणि औदुंबर देवकर यांचे सहकार्य लाभले असल्याचे कान्हेरे यांनी यावेळी सांगितले. 

* डोळ्यात पाणी येते..अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत बालपण गेले. तिथे लहानाचा मोठा झालो. खूप साऱ्या आठवणी आहेत. अशावेळी आपण एक सेलिब्रिटी म्हणून लोकांना घरात बसा, घरात राहण्याचे आवाहन करणे महत्वाची गोष्ट आहे. आमची सुरुवात चहा देण्यापासून झाली. पोलिसांना आल्याचा, मसाल्याचा, तुळशीचा चहा देऊ लागलो. त्यांना खूप बरे वाटले. आपल्यासाठी देखील कुणी काही करत आहे, आपली काळजी घेत आहे याचा त्यांना आनंद वाटला. हे सगळे व्यक्त होत असताना त्यांच्या डोळ्यात येणारे पाणी खूप काही सांगून जाणारे होते अशी भावना पराग यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसparag kanhereपराग कान्हेरेfoodअन्न