शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

ज्ञानोबा - तुकोबांचा पालखी सोहळा; पुण्यातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:06 IST

पालखी सोहळ्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोहळा प्रस्थानावेळी वाहतूक वळविण्यासोबत पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोहळा प्रस्थानावेळी वाहतूक वळविण्यासोबत पर्यायी मार्गाबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 

२२ जूनला सासवड येथे मुक्कामी असणार आहे. यावेळी पहाटे दोन वाजल्यापासून ते २४ जूनच्या रात्री १२ पर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवेघाट व बोपदेवघाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक खडी मशीन चौक-कात्रज-कापूरहोळ मार्गे, तसेच सासवडकडून पुण्याकडे येणारी वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे वळविण्यात येणार आहे, तर २४ व २५ जूनला जेजुरी आणि वाल्हे येथे मुक्काम असल्याने २४ जून रोजी पहाटे २ पासून ते २५ जूनला रात्री १२ वाजेदरम्यान पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-नीराकडे तसेच नीराकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे-मोरगाव-नीरामार्गे वळविण्यात येणार आहे.

२६ जूनला लोणंद येथे मुक्काम असल्याने पहाटे दोनपासून ते सायंकाळी पाचपर्यंत पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-निराकडे, तसेच नीराकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक सासवड-जेजुरी-मोरगाव मार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच २६ ते २८ जून दरम्यान लोणंद येथून फलटणकडे पालखी प्रस्थान करणार असून, या कालावधीत फलटण लोणंद येथून पुण्याकडे जाणारी, तसेच पुण्याहून फलटण व लोणंदकडे जाणारी वाहतूक शिरवळमार्गे वळविण्यात येणार आहे.

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 

२३ जूनला यवत येथे मुक्कामी असणार असून, २३ जूनला पहाटे दोन रात्री ते १२ पर्यंत पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक वाघोली-केसनंद-राहू-पारगाव-चौफुला, तसेच सोलापूरकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक चौफुला-पारगाव-राहू-केसनंद-वाघोली या मार्गे वळविण्यात येणार आहे, तर २४ जूनला वरवंड येथे मुक्कामी असल्याने पहाटे दोन ते रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक थेऊर फाटा-केसनंद-राहू-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ, तसेच सोलापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक कुरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-राहू-वाघोली-पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.

तसेच २५ जूनला उंडवडी येथे मुक्कामी असेल. यावेळी पहाटे दोन वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक चौफुला-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ, तसेच सोलापूरहून पुण्याकडे जाणारी जाणारी वाहतूक कुंरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-चौफुला-पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच पहाटे दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड रस्ता बंद करण्यात येणार असून, दरम्यान या मार्गावरील वाहतूक भिगवणमार्गे बारामती आणि बारामतीकडून येताना भिगवणमार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येतील. बारामतीहून पाटसकडे जाणारी वाहतूक बारामती-लोणीपाटी-सुपा-चौफुला-पाटस, तसेच पाटसहून बारामतीकडे जाणारी वाहने पाटस-चौफुला-सुपा-लोणीपाटी-बारामतीकडे येतील.

पालखी २६ जूनला उंडवडी ते बारामती दरम्यान बारामती शहरात मुक्कामी असणार असून, पहाटे दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड रस्ता बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक भिगवणमार्गे बारामती आणि बारामतीकडून भिगवणमार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येतील. २७ जूनला पालखी सणसर येथे मुक्कामी असणार असून, पहाटे दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती वाहतुकीचा रस्ता बंद करण्यात येणार असून, वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतूक जंक्शन येथून कळसमार्गे बारामती अष्टीकडे, तसेच बारामतीकडून येणारी वाहतूक भिगवण कळसमार्गे जंक्शनकडे वळविण्यात येणार आहे.

२८ जूनला निमगाव केतकी येथे मुक्कामी असणार असून, पहाटे २ ते २९ जूनला रात्री १२ वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती-कळंब-बावडा-इंदापूर, बारामती-भिगवण-इंदापूर, तसेच इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक इंदापूर-बावडा-कळंब-बारामती आणि इंदापूर-भिगवण-बारामती यामार्गे वळविण्यात येणार आहे.

२९ जूनला इंदापूर येथे मुक्कामी असून, पहाटे दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत निमगाव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकर-कळस-जंक्शन मार्गे बारामती किंवा लोणी-देवकर-भिगवण मार्गे बारामतीकडे यामार्गे वळविण्यात येणार आहे.

३० जूनला पहाटे ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक अकलूज-बावडा-नातेपूते बारामती, तसेच अकलूजकडून बारामती व पुण्याकडे जाण्याकरिता इंदापूर मुख्य महामार्गाचा वापर करावा. ३० जूनला इंदापूर शहरातील जुना पुणे-सोलापूर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून, वाहतूक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बाह्यमार्गाने वळविण्यात येणार आहे.

१ जुलैला सराटी येथे मुक्कामी असून, पहाटे २ ते रात्री १२ पर्यंत, तसेच ३ जुलैला पहाटे २ ते दुपारी १२ वाजेपर्यंत इंदापूर अकलूज रोडवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. इंदापूर ते अकलूज या मार्गावरील वाहने इंदापूर-हिंगणगाव-टेंभुर्णी-गणेशगाव-माळीनगर-अकलूज आणि अकलूज ते इंदापूर मार्गावरील वाहतूक अकलूज-नातेपूते-वालचंदनगर-जंक्शन-भिगवण या मार्गे वळविण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिसcarकारbikeबाईक