शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

"ग्यानबा तुकाराम ज्ञानोबाची पालखी", अन् टाळ - मृदंगाच्या तालावर आज निघणार संत तुकारामांची पालखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 12:52 IST

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देहूनगरीत सर्वत्र शुकशुकाट

ठळक मुद्देसंत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या रथाला आकर्षक फुलांची सजावट

पुणे: ग्यानबा तुकाराम ज्ञानोबाची पालखी अशा उत्साहपूर्व वातावरणाच्या गजरात आणि टाळ - मृदंगाच्या तालावर श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान होणार आहे. दरवर्षी सकाळपासूनच संपूर्ण देहूगाव संतांच्या आणि विठ्ठलाच्या गजराने दुमदुमून जाते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शुकशुकाट दिसून आला आहे.

आज दुपारी २ वाजता तुकाराम महाराजांच्या मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. सकाळपासूनच भजने, कीर्तने कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. मंदिराच्या आसपास पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दी न होण्याच्या दृष्टीने मंदिराचे ट्रस्टी आणि प्रशासनाकडून उत्तम प्रकारे काळजी घेतली जात आहे. 

दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य वारकरी देहूगावात येत असतात. प्रस्थान होण्याच्या आदल्या दिवशी सर्वत्र वारीचे उत्साहपूर्व वातावरण दिसून येते. माउली- तुकारामांच्या गजरात देहूनगरी दुमदुमून जाते. यंदा मात्र मागच्या वर्षीप्रमाणेच कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच विठ्ठलाला भेट देण्यासाठी ज्ञानेश्वर - तुकारामांच्या पादुका बसने जाणार आहेत. प्रशासनाकडून मर्यादित वारकऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे.

 यंदाही मंदिराच्या आसपासच्या परिसरात शुकशुकाट असला तरी पालखीच्या प्रस्थानाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मंदिराबाहेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याठिकाणी वारकरी, ट्रस्टी यांच्या तपासणीसाठी डॉक्टर आणि नर्सही तैनात आहेत. दुपारी २ च्या प्रस्थान सोहळ्यानंतर पादुका मुख्य मंदिरात राहणार आहेत. १९ जुलैला सकाळी ९ वाजता पादुका पंढरपूरकडे शासनाच्या बसने जातील. त्यानंतर १९ जुलै ते २४ जुलैपर्यंत पादुका पंढरपूरमध्ये राहतील. 

संत तुकाराम महाराजांच्या रथाला फुलांची सजावट 

संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या रथाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. गावकरी रथाचे दर्शनही घेत आहेत. लक्षवेधी रथ हा दरवर्षी पालखीचे आकर्षण ठरत असतो. 

टॅग्स :PuneपुणेSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाdehuदेहूMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसdocterडॉक्टर