शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वाघोलीत ५५ लाखांचा गुटखा हस्तगत; कोंढव्यातील वितरकाला पुरविण्यासाठी आणला जात होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 19:29 IST

नगर महामार्गावरुन गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पुणे : लॉकडाऊनच्या काळातही गुटखा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या वितरकाला देण्यासाठी २ टेम्पोमधून घेऊन येत असलेला ५५ लाख रुपयांचा गुटखा गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने जप्त केला.

याप्रकरणी नरेश देवाजी (रा. चिखली), सुरेश भाटी (रा. कोंढवा खुर्द) तसेच दोन्ही वाहनांचे चालक लखन लोंढे (रा.मोशी) आणि सुरेश कसाब (रा. चिंबळी फाटा, चाकण) अशा चौघांविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जप्त केलेला गुटखा हा चिखली येथील नरेश देवाशी याने कोंढव्यातील सुरेश भाटी याला पुरविण्यासाठी आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

नगर महामार्गावरुन गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक जयदीप पाटील, तसेच अंमलदार महेंद्र पवार, सचिन ढवळे, प्रविण भालचिम, दत्ता फुलसुंदर यांनी सकाळपासून नगर रोडवर सापळा लावला होता. सकाळी साडेदहा वाजता वाघोलीहून पुण्याच्या दिशेने दोन पिकअप व्हॅन वेगाने पुण्याकडे येत होत्या. संशयावरुन दोन्ही व्हॅन थांबवून तपासणी केली. त्यात दोन्ही व्हॅनमध्ये मिळून तब्बल ५५ लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. सुरेश भाटी याच्याविरुद्ध गुटखा बाळगल्याप्रकरणी यापूर्वीही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनानुसार याच पथकाने दमण आणि कर्नाटकात छापे घालून गुटखा फॅक्टरीवर कारवाई केली होती.सुरेश भाटी याच्याविरुद्ध गुटखा बाळगल्याप्रकरणी यापूर्वीही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेwagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसKondhvaकोंढवाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक