शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या; पुण्यात राष्ट्रवादीकडून पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 15:42 IST

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे

पुणे : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या आरक्षण विषयाला धरून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे अकोला, कोल्हापूर याठिकाणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात ९ सप्टेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पुणे पोलीस त्यांना अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदावर्ते यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे दोघा पती - पत्नीवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी तक्रार अर्जातून केली आहे. 

तक्रार अर्जात काय नमूद केले आहे  डॉ जयश्री पाटील यांनी यु ट्यूबवर गुणरत्न सदावर्ते यांचा व्हिडिओ प्रसारित केला असून त्यामध्ये सदावर्ते यांनी मराठा समाजाची उत्पत्ती कशी झाली ते कुठून आले यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केली आहे. त्यांच्या या भाषेने महाराष्टातील तमाम मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामध्ये जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न दोघांनी केला आहे. भारतीय संविधानाने जरी बोलण्याचे अधिकार दिलेले असले तरी त्यांना मर्यादा दिलेली आहे. ती गुणरत्न सदावर्ते व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी ओलांडली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडावी आणि जाती जातीमध्ये वाद लावून समाजात अराजकता माजेल या प्रकारचे कृत्य हे दोघे करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणे कामी गुन्हा दाखल करावा. हि विनंती करणारा अर्ज पोलिसांना देण्यात आला आहे.   

टॅग्स :advocateवकिलPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMaratha Reservationमराठा आरक्षणCourtन्यायालय