शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना जीएसटी चे सहायक आयुक्त जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 16:02 IST

तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २० मार्च रोजी तक्रार केली़ .त्यानुसार त्याची पडताळणी करण्यात आली़. तेव्हा तडजोड म्हणून त्यांनी ३० हजार रुपये घेण्याचे मान्य केले़.

ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी येरवडा येथील जी़ एस़ टी कार्यालयात सापळा रचला़.

पुणे : नियमाप्रमाणे व्हॅट भरला असतानाही तक्रारदारांच्या असेसमेंट आॅर्डर विरुद्ध अपिलामध्ये न जाण्यासाठी जीएसटी कार्यालयातील सहायक आयुक्त प्रसाद पुरुषोत्तम पाटील (वय ४८, रा़ प्रसादनगर, वडगाव शेरी ) यांना ३० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़.याबाबतची माहिती अशी, तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर आहेत़ त्यांनी २०१३ मध्ये वानवडी येथे महापालिकेचे बांधकामाचे एक काम घेतले होते़. त्यावेळी सिव्हिल वर्क कामावर ५ टक्के व्हॅट होता़ त्याप्रमाणे हा कर तक्रारदारांनी भरलेला होता़. परंतु, सहायक आयुक्त प्रसाद पाटील यांनी तुम्ही भरलेला टॅक्स कमी भरला आहे़. तो ८ टक्के प्रमाणे भरायचा आहे़. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी असेसमेंटची मागणी केली़. त्यावेळी पाटील यांनी तुम्हाला जरी अपिल करायचे असेल तर त्यासाठी अगोदर उरलेला व्हॅट व दंड असे १७ लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले़. जर यातून तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर ४५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी लाचेची मागणी केली़ . तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २० मार्च रोजी तक्रार केली़ .त्यानुसार त्याची पडताळणी करण्यात आली़. तेव्हा तडजोड म्हणून त्यांनी ३० हजार रुपये घेण्याचे मान्य केले़. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी येरवडा येथील जी़ एस़ टी कार्यालयात सापळा रचला़. तक्रारदार यांच्याकडून तेथील कँटीनमध्ये ३० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले़. पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, एस़ एस़ घार्गे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली़ कारवाईनंतर पोलीस पथकाने पाटील यांच्या वडगाव शेरी येथील घरामध्ये शोध सुरु केला आहे़

टॅग्स :PuneपुणेGST Officeमुख्य जीएसटी कार्यालयEmployeeकर्मचारीCrimeगुन्हाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग