शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसांवर आले होते लग्न मात्र नियतीने हिरावले सारे... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 21:47 IST

माणूस अनेकदा स्वप्न बघत असतो पण काळाच्या मनात मात्र वेगळेच काही असते. अशीच अत्यंत हृदयद्रावक घटना पुण्यात घडली आहे. अवघ्या पंधरा दिवसांवर लग्न आलेल्या युवकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

पुणे  : माणूस अनेकदा स्वप्न बघत असतो पण काळाच्या मनात मात्र वेगळेच काही असते. अशीच अत्यंत हृदयद्रावक घटना पुण्यात घडली आहे. अवघ्या पंधरा दिवसांवर लग्न आलेल्या युवकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, डंपरच्या चाकाखाली सापडल्याने विराज प्रताप निकम ( वय २९,  रा. मानव मंदिर सोसायटी धनकवडी, पुणे) याचा मृत्य झाला आहे .तर प्रितेश प्रवीण शहा ( वय २९, रा. गुलाब नगर सोसायटी धनकवडी, पुणे) हा तरुण या अपघातात  जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नवले पुलाजवळ घडली. विराज व प्रीतेश हे दोघे नऱ्हे येथील नवले पुलाजवळील सेवा रस्त्यावरून ऍक्टिवावरून (क्रमांक MH १२ PV ९४८४) नवले पुलाच्या सिग्नलकडे जात असताना डंपरच्या( क्रमांक MH १२ HB १५५५) चाकाखाली आल्याने त्यात गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तात्काळ जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान विराजचा मृत्यू झाला.

विराजचे १९ मार्च रोजी लग्न होते. तो मित्रासोबतचे काम उरकून घरातल्या व्यक्तींसोबत स्नेह्यांकडे केळवणास जाणार होता. त्यामुळे घरातही सगळे त्याची वाट बघत होते. मात्र तो प्रत्यक्ष जाण्यापूर्वीच त्याच्या मृत्यूची खबर पोचल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. लग्नाची तयारी पूर्ण झाली असताना प्रत्यक्ष नवरदेवाचाच करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान अपघात घडल्यानंतर डंपर जागेवरच सोडून चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. रात्री उशिरापर्यंत सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूDhayariधायरी