शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पुढील दोन महिने पुरेल एवढा किराणा व भुसार : नागरिकांनी साठा करू नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 20:19 IST

कुठलाही घाऊक अथवा किरकोळ व्यापारी हा चढ्या भावाने माल विकणार नाही.

ठळक मुद्देसोमवारपासून मार्केटमधील सर्व दुकाने सुरळीत सुरू ठेवण्यात येणार

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असून या निमित्ताने रविवारी मार्केट यार्डातील दुकानेही बंद आहेत. मात्र अत्यावश्यक सेवेमुळे सदर दुकाने सोमवारपासून उघडण्यात येणार असून नागरिकांनी विनाकारण किराणा व भुसार मालाचा साठा करून ठेवू नये, असे आवाहन दि पूना मर्चंट चेंबरने पुणेकरांना केले आहे. पुणे शहराला पुढील दोन महिने पुरेल एवढा किराणा व भुसार मालाचा साठा व्यापाऱ्यांकडे असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, कुठलाही घाऊक अथवा किरकोळ व्यापारी हा चढ्या भावाने माल विकणार नाही, याचीही आम्ही दक्षता घेतली असल्याचे चेंबरने सांगितले.चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, पुणे मार्केटमध्ये धान्याची कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे नागरिकांनी पुढील एक-दोन महिन्याचा किराणा माल भरून ठेवण्याची घाई करू नये. पुणे मार्केटमध्ये सर्व मालाची आवक-जावक सुरळीत चालू असून, केवळ रविवारी जनता कर्फ्यूमध्ये सर्व व्यापारी सहभागी होऊन आपली दुकाने पूर्णवेळ बंद ठेवणार आहेत. शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत शहरात अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत सुरू रहावा याकरिता सोमवारपासून मार्केटमधील सर्व दुकाने सुरळीत सुरू ठेवण्यात येणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी केलेल्या आवाहनानुसार चेंबरच्यावतीने, पुढील पंधरा दिवस दोन लाख गरीब नागरिकांना पंधरा दिवस पुरेल एवढा तेल, तूरडाळ, मीठ व चहा पावडरचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये ५ टन तूरडाळ, १५ टन मीठ, १० हजार अर्धा किलो तेलाचे पाऊच व २०० ग्रॅमचे २ हजार किलो चहा पावडरचे पाऊच मंगळवारी वडकी नाला येथील शासकीय गोदामात पोहचविण्यात येणार असल्याचेही ओस्तवाल यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेbusinessव्यवसायMarket Yardमार्केट यार्डCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस