यावेळी जि.प.शाळा शिवनगर(ता.शिरूर) चे उपक्रमशील शिक्षक बाळासाहेब घोडे व जि.प.शाळा पिंपळगाव तर्फ महाळुंगे (ता.आंबेगाव) च्या तंत्रस्नेही शिक्षिका मृणाल गांजाळे याचा नवोपक्रम स्पर्धेतील यशाबद्दल सन्मानपत्र,पुस्तक व शाल देवून विशेष सन्मान करण्यात आला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व कमलजादेवी विद्यालय,कळंब यांना बेंटली स्टेमद्वारा लॅपटॉप प्रदान करण्यात आले.इयत्ता दहावीतील ९० टक्याहून अधिक गुण मिळवणारे तनुजा भालेराव,शिवानी भालेराव,सानिका भालेराव,ईश्वरी राजगुरू,श्रद्धा कानडे,पायल भालेराव,आरती दुधाणे व इयत्ता बारावातील अनिकेत बेलसरकर,उज्ज्वला खेबडे,प्रगती शिंदे या विद्यार्थ्यांना ज्ञानलक्ष्मी सन्मानपत्र,रोख रक्कम व पुस्तक देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ अध्यापिका सुरेखा भालेराव,बाळासाहेब घोडे,मृणाल गांजाळे, प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब कानडे,माजी सभापती उषाताई कानडे यांची भाषणे झाली.यावेळी मुद्रा कारंडे हिची शिवघोषणा (गारद) व पायल खेबडे हिचे 'मी जिजाऊ' ने उपस्थितांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदर्श शिक्षक संतोष थोरात,मच्छिंद्र वायाळ,संतोष कानडे,गणेश लोहकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.प्रास्ताविक विजय दाते,सूत्रसंचालन विकास कानडे तर आभार प्राचार्य एम.आर.पाटील यांनी मानले.
कळंब(ता.आंबेगाव) येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमा पूजनप्रसंगी माजी सभापती उषाताई कानडे,सरपंच राजश्रीताई भालेराव व उपस्थित मान्यवर.