आजी-आजोबाही भारावले
By Admin | Updated: February 15, 2016 02:45 IST2016-02-15T02:45:44+5:302016-02-15T02:45:44+5:30
आंबेगाव बु. येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांसोबत आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाइन डे साजरा केला

आजी-आजोबाही भारावले
पुणे : आंबेगाव बु. येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांसोबत आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाइन डे साजरा केला. विद्यार्थ्यांच्या या अभिनव भेटीचे आजी-आजोबांनीही भरभरून कौतुक केले.
अभिनव संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी रविवारी सेवाधाम वृद्धाश्रमात जाऊन तेथील आजी-आजोबांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला तेथील आजी-आजोबांचे पाद्यपूजन केले. त्यानंतर औक्षण करून त्यांना गुलाबपुष्प भेट दिले. त्यामुळे सर्वजण भारावून गेले होते. ‘अभिनव’चे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, सचिव सुनीता जगताप यांच्यासह वृद्धाश्रमाच्या संस्थापिका प्रतिभा पायगुडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी ओंकार रायकर, आशिष ढगे, हितेश सुतार, सौरभ वालगुडे, शुभम शेळके, रवींद्र मालवीय, शिल्पा काळे, ऋतुजा सुतार, अंकिता पारगे व नाजिया पटेल यांनी आपला अनुभव सांगितला. प्राचार्या वर्षा शर्मा व कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षदा मळेकर, प्रियांका हांडे, मैथिली आदवडे व वर्धमान जैन यांनी सर्व स्वयंसेवकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला.