शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ताईंच्या हस्ते दादा-वहिनींचा सन्मान; कृषक कृषी प्रदर्शन उद्घाटन समारंभाला पवार कुटुंबीय एकाच मंचावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:09 IST

बदललेल्या राजकीय समीकरणानंतर एकमेेकांविरोधात शड्डू ठोकलेले पवार कुटुंबीय या निमित्ताने एकत्र आल्याचे बारामतीकरांना पाहावयास मिळाले. मात्र

बारामती :बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित कृषक या कृषी प्रदर्शन उद्घाटन समारंभाला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मयुरेश्वर अभयारण्यातील चिंकारा हरणाची प्रतिकृती देऊन अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचा सत्कार करण्यात आला. बदललेल्या राजकीय समीकरणानंतर एकमेेकांविरोधात शड्डू ठोकलेले पवार कुटुंबीय या निमित्ताने एकत्र आल्याचे बारामतीकरांना पाहावयास मिळाले. मात्र, यामध्ये कोणाचाही अपेक्षित संवाद रंगला नसल्याचे चित्र दिसून आले.

लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर काका-पुतण्या, नणंद-भावजय देखील एका मंचावर एकत्र आले होते. यावेळी रोबोटने सत्कारासाठी लहान रोपटं आणलं. जेव्हा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याचं मंचावर पुकारण्यात आलं तेव्हा अजित पवार यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं. राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचाही सत्कार सुप्रिया सुळे यांनी केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज दोन मंत्री याठिकाणी आले आहेत. आपण पुन्हा याठिकाणी याल, अशी अपेक्षा आहे. आता वर्षभर कुठलेही इलेक्शन नाही, त्यामुळे तिळगूळ घेऊया आणि वर्षभर गोड गोड बोलूया, असं म्हणत संक्रांतीच्या शुभेच्छाही सुप्रिया सुळे यांनी सर्वांना दिल्या.पहाटेचा शपथविधी आठवा -

सकाळी लवकर उठून कामाला लागण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. अजित दादांना माहिती आहे, मी उशिरा उठतो. दादांनी रात्रीच सांगितलं होतं. उद्याच्या दिवस तसदी घ्यावी लागेल. तेव्हा मी त्यांना म्हटलं जेव्हा गरज असते, तेव्हा खांद्याला खांदा लावून मी कुठेही उपस्थित असतो. नसेल तर पहाटेचा शपथविधी आठवा. मीच त्यावेळी पाठीमागे उभा होतो, अशी मिश्किल टिप्पणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

एकमेकांचा नामोल्लेख टाळला -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात ‘आदरणीय पवारसाहेब’, यांसह विविध उपस्थित मंत्र्यांचा नामोल्लेख करून केली, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोणाचेही नाव न घेता थेट भाषणाला सुरुवात केली. ज्येष्ठ नेते पवार नेहमीच त्यांच्या भाषणाची सुरुवात उपस्थित मान्यवरांची नावे घेऊन करतात. मात्र, आजचे त्यांचे भाषण अपवाद ठरले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रSupriya Suleसुप्रिया सुळेPankaja Mundeपंकजा मुंडेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारBaramatiबारामती