शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! डंपरच्या धडकेत आजोबा आणि दीड वर्षाच्या नातवाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 09:55 IST

अपघातानंतर डंपरचालक पसार...

पुणे : भरधाव डंपरने मोटारीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आजोबांसह दीड वर्षीय नातू मृत्युमुखी पडल्याची घटना पुणे-नगर रस्त्यावर घडली. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला आहे.

अद्वैत अमोल कुलकर्णी (वय दीड, रा. मोशी, हवेली) आणि महेश संभुस (६०) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात नीलिमा महेश संभूस (५५) जखमी झाल्या आहेत. याबाबत दीपा कुलकर्णी (३१) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा अपघात १२ जून रोजी दुपारी चार वाजता पुणे-नगर रोडवरील ओम साई हॉटेलसमोर घडला.

दीपा त्यांचा मुलगा अद्वैत आणि आई नीलिमा आणि वडील महेश रविवारी (१२ जून) मोटारीतून पुणे-नगर रस्त्यावरून नगरकडे जात होते. महेश हे मोटार चालवित होते. नगर रस्त्यावरील ओम साई हॉटेलसमोर डंपरने मोटारीस धडक दिली. अपघातात अद्वैत, महेश गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातानंतर पसार झालेल्या डंपरचालकाचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक सुहास पाटील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी