शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

आजीबाईंमध्ये संचारली रणरागिणी : बिबट्याशी केले दोन हात !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 3:54 PM

अचानक दिसलेल्या बिबट्याला बघून त्यांनी जखमी अवस्थेतही झुंज दिली आणि स्वतःसह आजूबाजूच्या लोकांचे प्राण वाचवण्यात त्या यशस्वी झाल्या. 

पुणे : रोजचा दिवस नवी आव्हान घेऊन येत असतो. समोर आलेल्या संकटासोबत दोन हात करून पुढे जाण्यात तर जगण्याचा खरा आनंद असतो असं म्हटलं जाते. असाच अनुभव घेतला आहे पुण्यातील सुमित्रा आजींनी ! अचानक दिसलेल्या बिबट्याला बघून त्यांनी जखमी अवस्थेतही झुंज दिली आणि स्वतःसह आजूबाजूच्या लोकांचे प्राण वाचवण्यात त्या यशस्वी झाल्या. 

             आज सकाळी सहाच्या सुमारास पुण्याजवळील केशवनगरमध्ये बिबट्याने प्रवेश केला.  या बिबट्याने सुमारे पाच नागरिकांना जखमी करून अक्षरशः हैदोस घेतला. अखेर वन विभाग, अग्निशमन दल आणि महापालिकेच्या यंत्रणेने मोठ्या शिताफीने या बिबट्याला जेरबंद केले. या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सुमित्रा सूर्यकांत तारू यांच्यासोबत घडलेला प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. 

           सोमवारी सकाळी उठल्यावर त्या दिनक्रमाप्रमाणे अंगणातील चुलीवर पाणी तापवण्यासाठी बाहेर पडल्या. बाहेर पडल्यावर त्यांना जवळच कुत्रा उभा असल्याचं दिसलं. अर्थात बाहेर अंधार असल्यामुळे काही वेळात पुन्हा पाहिल्यावर त्यांना कुत्रा नव्हे तर बिबट्या असल्याचं लक्षात आलं. बिबट्या बघताच त्यांनी बाजूला पडलेली बादली बिबटयाच्या डोक्यात घातली आणि त्या ओरडत पळत सुटल्या. त्यांच्याकडून अचानक झालेल्या प्रतिकारामुळे बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली आणि मानेला, डोक्याला ओरबाडले. त्यांनी  त्या धैर्याने, न घाबरता प्रतिकार सुरु ठेवला. अखेर बिबट्याने भिंतीवरून उडी मारली आणि पुढे चालता झाला. सध्या सुमित्रा आजींवर उपचार सुरु आहेत. मात्र त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

टॅग्स :leopardबिबट्याenvironmentवातावरण