शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या; जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतींसाठी गुरूवारी मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 11:18 IST

जिल्ह्यातील 748 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापैकी 95 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

पुणे : जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून गावा-गावत धडाडणा-या ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या तोफा मंगळवार (दि.13) रोजी सायंकाळी थंडावल्या. जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतीसाठी आता गुरूवार (दि.15) जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील 748 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापैकी 95 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे आता 649 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत गेल्या आठ दिवसात सर्व उमेदवाराने जोरदार प्रचार केला. यात काही उमेदवारांनी सोशल मिडीयाचा वापर करत जोरदार प्रमोशन केले. तर गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या गावात पार्ट्यांवर पार्ट्या सुरू आहेत. अनेक ठिकाणी पॅनल उभे करून उमेदवारांनी प्रचारात रंगत आणली, घरोघरी जाऊन प्रचार, गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांनी भर दिला. जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतीत तरुण उमेदवारांनी विविध माध्यमांचा वापर करत प्रचारात आघाडी घेतली. प्रचार फेरी काढताना ट्रकवर,  बैलगाडी, ओपन जिप्सिचा वापर देखील मोठ्याप्रमाणात केला. तर काहीने आपल्या पदयात्रेद्वारे प्रचार केला.आता येत्या 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. तर, 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.---------मतदान होणाऱ्या ग्रामपंचायती : 649- एकूण मतदान केंद्र  : 2461- निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार  : 11007 - निवडणूक अधिकारी, कर्मचारी : 12305- एकूण मतदार  : 14 लाख 58 हजार 367

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस