शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

गोवारीकरांनी ‘पानिपत’ करताना केला ‘विश्वास’घात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 13:50 IST

बौध्दिक संपदेची चोरी केल्याचा आरोप

ठळक मुद्देविश्वास पाटील यांची उच्च न्यायालयात धावचित्रपटाची कथा, प्रसंग, पात्रे आपल्या कादंबरीवर बेतलेली आहेत, असा आरोप

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांनी आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चित्रपटाची कथा, प्रसंग, पात्रे आपल्या कादंबरीवर बेतलेली आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. चित्रपटासाठी पूर्वपरवानगी न घेतल्याने कॉपीराईट कायद्याचा भंग झाला असून, बौध्दिक संपदेची चोरी झाल्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन्स, निर्माते रोहित शेलाटकर, सुनिता गोवारीकर आणि रिलायन्स एंटरटेनमेंटकडून भरपाईची मागणी केली आहे. विश्वास पाटील यांच्या परवानगीशिवाय त्यांची ‘पानिपत’ ही लोकप्रिय कादंबरी आणि ‘रणांगण’ या नाटकातील प्रसंग, कथा आणि बरासचा भाग चोरल्याचे त्यांचे म्हणणे आहे.‘लोकमत’शी बोलताना विश्वास पाटील म्हणाले, माझ्या ‘पानिपत’ या कादंबरीतील आत्मा आणि ध्येयाचीच चित्रपटाद्वारे चोरी करण्यात आली आहे. कादंबरी १९८८ मध्ये प्रकाशित झाली. त्यापूर्वी पानिपतची लढाई म्हणजे पराभव, काळिमा असेच मानले जायचे. जबाबदार इतिहासकारांनीही याबाबात हिणकसपणे लिहिले. मी पानिपतबाबत खूप संशोधन केले, कागदपत्रांचा अभ्यास केला आणि त्यातील अभिमानास्पद बाब, लढवय्या भूमिका वाचकांसमोर आणल्या. ‘पानिपत’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर धक्काच बसला. वाड:मयचौर्याविरोधात न्याय मिळावा, यासाठी मी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.कान्स फिल्म फेस्टिव्हलदरम्यान, रोहित शेलटकर हे लेखक संजय पाटील यांना भेटले आणि ‘पानिपत’विषयी चर्चा केली. संजय पाटील यांनी संहिता लिहिली आणि शेलटकर यांच्या मुंबईमधील आॅफिसमध्ये संहितेचे वाचनही झाले. संजय पाटील यांनी संहिता लिहिण्यापूर्वी विश्वास पाटील यांची परवानगीही घेतली होती. मात्र, कालांतराने रोहित शेलटकर यांनी संजय पाटील यांच्यापासून फारकत घेत विषयच थांबवला. ‘पानिपत’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर धक्काच बसला. आपल्या कादंबरीतील पात्रे, घटना, प्रसंग आणि बराचदा भाग पूर्वपरवानगीशिवाय चोरला गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे २३ नोव्हेंबर रोजी या प्रकरणाबाबत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. दिग्दर्शक, निर्मात्याकडून संहिता मागवून घेणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे विश्वास पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.‘पानिपत’विषयी...विश्वास पाटील यांना १९९२मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ‘महानायक’ आणि ‘झाडाझडती’ या त्यांच्या कादंबरीही वाचकांमध्ये लोकप्रिय ठरल्या. ‘पानिपत’ ही कादंबरी १९८८ मध्ये प्रकाशित झाली. कादंबरीच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन १९९१ मध्ये झाले. त्यानंतर गुजराती, पंजाबी, कन्नड आणि इतर अनेक भाषांमध्ये ‘पानिपत’ने ठसा उमटवला. भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये कादंबरीच्या जवळपास तीन लाख प्रतींची आजवर विक्री झाली आहे. विश्वास पाटील यांनी ‘पानिपत’ या कादंबरीवर आधारित ‘रणांगण’ हे नाटक लिहिले. वामन केंद्रे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले. दिल्ली, जबलपूर, गोवा, हैदराबाद आणि इतर अनेक शहरांमध्ये ‘रणांगण’चे जवळपास ४०० प्रयोग सादर झाले. ‘पानिपत’ या कादंबरीपूर्वी इतिहासातील या घटनेकडे कधीच अभिमानाने पाहण्यात आले नव्हते. विश्वास पाटील यांनी या विषयावर तब्बल ८ वर्ष संशोधन केले. पानिपतच्या लढाईचे विविध कंगोरे बारकाईने जाणून घेतले आणि भाऊसाहेब या लढवय्याची ओळख महाराष्ट्रालाच नव्हे, तर साºया देशाला करुन दिली.

......

बौध्दिक संपदेचे रक्षण करणे, मला महत्वाचे वाटते. कवी, लेखक यांना मिळणारे उत्पन्न खूप कमी असते. त्यामुळे ते शक्यतो कोर्टाच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे दिग्दर्शक, निर्माते वाड:मयचौर्याचे धाडस करुन लेखकांचे नुकसान करतात. ‘पानिपत’च्या निमित्ताने दिग्दर्शक, निर्मात्यांना धडा शिकवावा, यासाठी मी हे पाऊल उचलले आहे.- विश्वास पाटील

टॅग्स :PuneपुणेPanipat MovieपानिपतAshutosh Gowarikarआशुतोष गोवारिकरVishwash Patilविश्वास पाटील cinemaसिनेमा