शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जात, उत्पन्न दाखल्यांसाठी शासकीय कचेऱ्यांचे हेलपाटे

By admin | Updated: April 3, 2015 03:27 IST

ग्रामपंचायतींच्या निवडणूक तयारीला लागलेल्या इच्छुकांची जात दाखल्यांसह विविध कागदपत्रे मिळविण्यासाठी फरपट सुरू झाली आहे.

अंकुश जगताप, पिंपरीग्रामपंचायतींच्या निवडणूक तयारीला लागलेल्या इच्छुकांची जात दाखल्यांसह विविध कागदपत्रे मिळविण्यासाठी फरपट सुरू झाली आहे. एकेका कागदपत्राचा शोध लागत नसल्याचे लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या कर्मचाऱ्यांकडून इच्छुकांना सांगितले जात आहे. मावळ तालुक्यासह दस्तांचे संगणकीकरण झालेल्या मुळशी तालुक्यातही हीच स्थिती आहे. त्यामुळे भावी उमेदवारांना निवडणुकीआधीच सरकारी कचेऱ्यांचे हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. मावळ तालुक्यातील ५१, तर मुळशी तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींचा कार्यकाल आॅगस्टमध्ये संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी उमेदवारांना तहसील कार्यालयाकडून जातीचा दाखला दिला जातो. त्यासाठी मागास वर्गातील समाजाला आपल्या पूर्वजांच्या जातीच्या दाखल्या संदर्भातील पुरावे जोडावे लागतात. शाळा सोडण्याचा दाखला असो, अथवा पूर्वजांचे आधीच्या कोणत्याही कागदपत्रावरील जातीचे उल्लेख, यासाठी वारसदारांना शोधाशोध घ्यावी लागत आहे. काही उमेदवारांनी कुणबी प्रमाणपत्रावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. काही जणांनी पूर्वीच हे प्रमाणपत्र हातात पाडून घेतले आहे. मात्र, नव्याने निवडणुकीची गणिते मांडण्याच्या तयारीत असणाऱ्या नवख्या गावकारभाऱ्यांनी निवडणूक जवळ येताच याची तयारी चालविली आहे. वास्तविक वंशपरंपरेनुसार कुणबी हा उल्लेख पुढच्या पिढ्यांपर्यंत येणे गरजेचे असताना महसूल विभागाकडून हे उल्लेख राहून गेल्याचा प्रत्यय अनेकांना येत आहे. तर वारसदारही आजवर गाफील राहिल्याने त्यांना आता ऐनवेळी धावाधाव करण्याची वेळ आली आहे.