पुणे विद्यापीठच्या राष्ट्रीय सेवा याेजनेच्या स्वयंसेवकांचे राज्यपालांनी केले काैतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 08:30 PM2019-08-19T20:30:02+5:302019-08-19T20:31:43+5:30

स्वच्छ वारी निर्मल वारी हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल राज्यपालांनी पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा याेजनेच्या स्वयंसेवकांचे काैतुक केले.

governor praise the student of national service scheme for doing good job in wari | पुणे विद्यापीठच्या राष्ट्रीय सेवा याेजनेच्या स्वयंसेवकांचे राज्यपालांनी केले काैतुक

पुणे विद्यापीठच्या राष्ट्रीय सेवा याेजनेच्या स्वयंसेवकांचे राज्यपालांनी केले काैतुक

Next

पुणे : स्वच्छ वारी निर्मल वारी हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा याेजनेच्या विद्यार्थ्यांचे काैतुक केले आहे. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रविंद्रजी वायकर, उच्च शिक्षण सचिव विजयराव,  कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरू डॉ. एन.एस. उमरानी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य मा. राजेश पांडे, डॉ.संजय चाकणे, डॉ.प्रसेनजित फडणवीस,  डॉ. विलास उगले, अधिसभा सदस्य गिरीश भवाळकर , रासेयो राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंके उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने 15 हजार राष्ट्रीय सेवा याेजनेच्या विद्यार्थ्यांना लिंबाची राेपे वाटण्यात आली हाेती. ही राेपे विद्यार्थी वारी मार्गात विविध ठिकाणी लावण्यात येणार हाेती. 23 जून ते 15 जुलै या कालावधीत संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज या दाेन्ही पालखी साेहळ्यात 35 हजार स्वयंसेवकांनी सहभागी हाेऊन स्वच्छ वारी स्वस्थ वारी निर्मल वारी हरीत वारी हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. याबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वयंसेवकांचे काैतुक केले. 

Web Title: governor praise the student of national service scheme for doing good job in wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.