शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

मराठा आरक्षणावर सरकारने काढलेला जीआर चुकीचा : पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 19:54 IST

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने काढलेला जीआर हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारचा चुकीचा निर्णय कुठल्या सरकारने घेतला नव्हता.

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने काढलेला जीआर हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारचा चुकीचा निर्णय कुठल्या सरकारने घेतला नव्हता.मुख्यमंत्री आरक्षणाच्या मुद्द्यावर पळ काढत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय.

                    शुक्रवारी पुण्यात आयोजित दुष्काळ निर्मूलन परिषदेला पृथ्वीराज चव्हाण यांनी हजेरी लावली त्यावेळी ते बोलत होते.मराठा आरक्षण मिळावे ही भूमिका आहे मात्र सध्याच्या 52 टक्के आरक्षणाला धक्का लागायला नको अशी काँग्रेसची भूमिका आहे, मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा एकमताचा नाही असं दिसतंय तसेच सरकार सभागृहाच्या पटलावर हा अहवाल ठेवणार असे ही दिसत असल्याचे चव्हाण म्हणाले. मात्र सरकारने याबाबत जो जीआर काढला आहे ते पाहता मुख्यमंत्री आपली जबाबदारी झटकत आहेत, एक मंत्र्यांकडे याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना देत येणार नाही हा निर्णय स्वतः मुख्यमंत्र्यांनीचं घेतली पाहिजे, राज्यातील एक तृतीयांश लोकांचा हा प्रश्न आहे मात्र मुख्यमंत्री पळ काढतायत असा आरोप करत जी समिती याबाबत निर्णय घेईल त्या निर्णयाला पूर्णपणे मुख्यमंत्रीच जबाबदार असतील असे चव्हाण म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे तुम्हाला क्रेडिट घ्यायचे ते घ्या आम्ही अभिनंदन करू आमचा विरोध नाही फक्त निर्णय लवकर घ्या फसवाफसवी करू नका असे चव्हाण म्हणाले. 

                    शिवसेनेच्या चलो अयोध्या यात्रेबाबत बोलताना, गेल्या चार वर्षात वेळवेळी राममंदिराचा मुद्दा राज्यकर्त्यांनी पुढे करत राजकारण केले आता बरोबर निवडणूक आल्या त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचे हे सगळे प्रयत्न असल्याचे चव्हाण म्हणाले, निवडणुका जश्या जवळ येतील तसा हा मुद्दा अधिक तापवला जाईल आणि निवडणुकीनंतर पुन्हा सगळे विसरून जातील हा सगळा पोरखेळ सुरू आहे अशी टीका चव्हाण यांनी केली..राज्यात अनेक गंभीर प्रश्न आहेत दुष्काळ चिंताजनक आहे मात्र सरकार याबाबत गंभीर नाही असही चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेले ठळक मुद्दे :

  • मराठ्यांना आरक्षण देताना सध्याच्या ५२ टक्के टक्के आरक्षणाला धक्का नको 
  •  सरकारने काढलेल्या जीआरवरून मुख्यमंत्री जबाबदारी झटकत असल्याची टीका 
  • राज्यातील एक तृतीयांश लोकांचा प्रश्न असताना मुख्यमंत्री पळ काढत असल्याचा घणाघात 
  • सरकारने लवकर निर्णय घ्यावा,फसवाफसवी करू नये 
  • सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही 
  • आगामी निवडणुका बघून धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न 
टॅग्स :PuneपुणेPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस