Maratha Reservation: सरकार मराठा समाजाच्या कुठल्याच मागण्यांचा विचार करत नाही; संभाजीराजेंची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 12:53 PM2022-01-17T12:53:57+5:302022-01-17T12:54:21+5:30

मराठा समाजाचे पाच मूलभूत प्रश्न आहेत, जे मी वारंवार सरकारसमोर मांडले आहेत. ते सरकारच्या हातातले विषय आहेत. आरक्षण हे टप्प्याटप्याने मिळणार आहे परंतु जे सरकारच्या हातात आहे ते तर त्यांनी द्यावे

The government does not consider any of the demands of the maratha community said chhatrapati sambhaji raje | Maratha Reservation: सरकार मराठा समाजाच्या कुठल्याच मागण्यांचा विचार करत नाही; संभाजीराजेंची खंत

Maratha Reservation: सरकार मराठा समाजाच्या कुठल्याच मागण्यांचा विचार करत नाही; संभाजीराजेंची खंत

googlenewsNext

पुणे : मराठा समाजाचे पाच मूलभूत प्रश्न आहेत, जे मी वारंवार सरकारसमोर मांडले आहेत. ते सरकारच्या हातातले विषय आहेत. आरक्षण हे टप्प्याटप्याने मिळणार आहे परंतु जे सरकारच्या हातात आहे ते तर त्यांनी द्यावे. उदा. नियुक्त्या. ओबीसींना ज्याप्रमाणे शिक्षणात सवलती मिळतात तशाच सवलती गरीब मराठ्यांना द्या. परंतु सरकार मराठा समाजाच्या कुठल्याच मागणीबाबत विचार करत नसल्याची खंत छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी बोलून दाखवली. ते पुण्यात बोलत होते.

संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणवर बोलण्याचा अधिकार मराठा समाजातील सर्व संघटनाना आहे. मी सुद्धा अनेकदा सरकारला याबाबत सांगितले आहे. आरक्षण हा एक वेगळा टप्पा आहे. ते लगेच मिळू शकत नाही. परंतु सरकारच्या समोर मी जे पाच मूलभूत प्रश्‍न मांडले होते त्यावर अजूनही मार्ग निघाला नाही. मी शांत बसलोय, लोकसुद्धा विचार करत असतील की राजे शांत का बसले परंतु वेळ प्रसंगी मी बोलेल. बरोबर नसणाऱ्या अनेक गोष्टी सध्या घडत आहे. सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा मराठा समाज काही गप्प बसणार नाही..

ओबीसींवर अन्याय होऊ नये

केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो लवकरात लवकर त्यांनी ओबीसी आरक्षणवर निर्णय घ्यावा. एम्पिरिकल डाटा गोळा करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या. ओबीसींवर अन्याय होऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे.

Web Title: The government does not consider any of the demands of the maratha community said chhatrapati sambhaji raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.