Got a plaza from Pune for a pregnant woman in Kolkata | कोलकत्यावरून गर्भवती महिलेसाठी 'प्लाझ्मा'ची डिमांड; पुण्यातील 'वंदे मातरम संघटने'ची १५ मिनिटांत कमाल

कोलकत्यावरून गर्भवती महिलेसाठी 'प्लाझ्मा'ची डिमांड; पुण्यातील 'वंदे मातरम संघटने'ची १५ मिनिटांत कमाल

ठळक मुद्देवंदे मातरम संघटनेमुळे झाले शक्य

पुणे: कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत कोलकात्यामधील गर्भवती महिलेला ए निगेटिव्ह प्लाझाची गरज असते. त्यांचा वंदे मातरम संघटनेला फोन येतो. तात्काळ संघटनेत हालचाल सुरू होते. सोशल मीडियाची ताकद आणि संपर्क यावर संघटना १५ मिनिटांत प्लाझ्मा मिळवून देते. यावर कोलकात्यामधील महिलेच्या नातेवाईकांनी संघटनेचे आभार मानले आहेत. 

कोलकात्याला एक गर्भवती महिला कोरोनाशी झुंज देत आहे. त्यांना प्लाझाची गरज भासू लागते. अशा परिस्थितीत कोणाकडून प्लाझा मागवता येईल असे प्रश्न उभे राहतात. कोणतरी त्यांना वंदे मातरम संघटनेचा नंबर देते. संघटनेतील वैभव वाघ यांना फोन येतो. आणि गर्भवती महिलेसाठी ए निगेटिव्ह  प्लाझ्माची मागणी केली जाते. वैभव वाघ संघटनेच्या माध्यमातून सोशल मीडिया आणि जनसंपर्काच्या मदतीने प्लाझासाठी खटपट करू लागतात. अशा परिस्थितीत १५ मिनिटांत प्लाझा उपलब्ध होतो. कोरोनाच्या वेगापेक्षा माणुसकी व्हायरल होण्याचे हा अनुभव आहे. असे वैभव वाघ यांनी सांगितले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Got a plaza from Pune for a pregnant woman in Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.