शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

गुंडांना गावठी पिस्तूल विकायला आला, पोलिसांनी बेड्या ठोकल्या

By विवेक भुसे | Updated: December 19, 2023 20:09 IST

७ पिस्तुलांसह २४ काडतुसे जप्त : नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलिसांची कारवाई

पुणे : गावठी पिस्तुलांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या गुंडांना कोंढवा पोलिसांनी पकडले. ही कारवाई बोपदेव घाट परिसरात करण्यात आली. गुंडांकडून सात गावठी पिस्तुले, २४ काडतुसे जप्त करण्यात आली. पोलिसांच्या पथकाने जळगाव परिसरातून गुंडांना पिस्तूले पुरविणाऱ्या एकास अटक केली.

संदेश उर्फ संजय अंकुश जाधव (वय ३२, रा. गोकुळ हाऊसिंग सोसायटी, मोरे वस्ती, चिखली), शिवाजी उर्फ शिवा भाऊ कुडेकर (वय ३४, रा. वाशेरे, ता. खेड), राहुल नानसिंग लिंगवाले अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तपास पथक गस्त घालत असताना पोलिस हवालदार विशाल मेमाणे यांना बोपदेव घाटात दोघे जण काही दिवसांपासून कमरेला पिस्तुल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गारवा हॉटेलजवळ पोलिस पथक वेषांतर करुन थांबले. मिळालेल्या माहितीनुसार वडाफच्या गाडीतून दोघे जण तेथे आले. पोलिस पथकाने त्यांच्यावर झडप घालून पकडले. दोघांकडे प्रत्येकी एक पिस्तुल व काडतुसे आढळून असल्याचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितले.

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील उमराटी गावातून ओंकार बर्नाला याच्याकडून पिस्तुले खरेदी केल्याची त्यांनी कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी यांच्या माध्यमातून बर्नालाशी संपर्क साधून २ पिस्तूल आणि १० काडतुसांची मागणी केली. पोलिस पथक चोपडा येथे पोहचले. बर्नालाने त्याचा साथीदार लिंगवाले याला हत्यारे घेऊन पाठविले. पोलिसांनी ग्रामस्थांप्रमाणे वेशभूषा केली होती. पोलिसांनी लिंगवालेला पकडले. त्याच्याकडून २ पिस्तूल आणि १० काडतुसे जप्त करण्यात आली. हे पाहून काही अंतरावर थांबलेला बर्नाला पसार झाला.पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त शाहूराजे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, निरीक्षक संदीप भोसले, संजय मोगले, सहायक निरीक्षक दिनेश पाटील, लेखाजी शिंदे, विशाल मेमाणे, सतीश चव्हाण, निलेश देसाई, लवेश शिंदे, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे यांनी ही कामगिरी केली.

दोघेही सराईत

संदेश जाधव, शिवाजी कुडेकर हे दोघेही सराइत गुन्हेगार आहेत. संदेशविरुद्ध चिखली, देहूरोड, वडगाव मावळ, चिखली, भोसरी पोलीस ठाण्यात ३२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार शिवाजी याच्याविरुद्ध खून, लूट असे गंभीर स्वरुपाचे तीन गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकMONEYपैसा