Pune: जिममधून लंपास केलं पाऊण कोटीचं सामान; सदाशिव पेठेतील घटना, ६ जणांवर गुन्हा

By नितीश गोवंडे | Updated: February 22, 2024 16:09 IST2024-02-22T16:08:36+5:302024-02-22T16:09:08+5:30

हा प्रकार सप्टेंबर २०२२ ते जून २०२३ या कालावधीत सीटी बारबेल क्लब, जिम टीसीजी स्केअर येथे घडला...

Goods worth Rs.5 crore looted from the gym; Incident in Sadashiv Peth, crime against 6 persons | Pune: जिममधून लंपास केलं पाऊण कोटीचं सामान; सदाशिव पेठेतील घटना, ६ जणांवर गुन्हा

Pune: जिममधून लंपास केलं पाऊण कोटीचं सामान; सदाशिव पेठेतील घटना, ६ जणांवर गुन्हा

पुणे : सदाशिव पेठेतील एका जिममधून रोख रक्कम आणि जिमचे सामान असा एकूण ७३ लाख ३८ हजार ५१५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार सप्टेंबर २०२२ ते जून २०२३ या कालावधीत सीटी बारबेल क्लब, जिम टीसीजी स्केअर येथे घडला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत कर्वे रोड येथे राहणाऱ्या ६२ वर्षीय महिलेने बुधवारी (दि. २१) विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून राहुल हरिभक्त, संकेत हरिभक्त, आर्यन हरिभक्त, विवेकानंद एस. किसरकर, विनायक केशव बापट आणि अविनाश आनंद जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांची सदाशिव पेठेत जिम असून, आरोपी त्यांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी फिर्यादी यांना वेळोवेळी शिवीगाळ व दमदाटी करून धक्काबुक्की केली. फिर्यादी यांची जिम बंद असताना आरोपींनी जिममधील महागाचे सामान व रोख रक्कम चोरून नेली. याबाबत फिर्यादी यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने सीआरपीसी कलम १५६ (३) नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष मोरे करत आहेत.

Web Title: Goods worth Rs.5 crore looted from the gym; Incident in Sadashiv Peth, crime against 6 persons