शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

खूशखबर! टेमघरची गळती आली आटोक्यात : यंदा करणार शंभर टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 08:00 IST

अवघ्या १५ वर्षांमधेच धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे दोन वर्षांपूर्वी समोर आले.

ठळक मुद्दे झालेल्या कामाचे परीक्षण होणार डिसेंबरमधेगेल्या दोन वर्षांपासून धरणाच्या भेगा बुजविण्याचे आणि धरणाला मजबुती आणण्याचे काम सुरु या प्रकरणी जलसंपदातील तत्कालिन अधिकाऱ्यांबरोबरच संबंधित व्यक्तींवरही गुन्हा दाखल

- विशाल शिर्के- पुणे :दोन वर्षांपूर्वी गळतीमुळे राज्यभर गाजलेल्या टेमघर धरणामधे दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यात येणार आहे. पाणीबाणीच्या काळामधे हा एक मोठा दिलासा मानला जात आहे. धरणातील भेगा बुजविण्याचे काम ८५ टक्के पूर्ण झाल्याने गळती आटोक्यात आल्याने, धरणात शंभरटक्के पाणी साठविण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे पावणेचार अब्ज घनफूट पाणी (टीएमसी) पाणी उपलब्ध होईल. पुणे शहराची साडेतीन महिन्यांची तहान यात भागू शकते. मुळशी तालुत्यातील मुठा गावाजवळ मुठा नदीवर हे धरण बांधण्यात आले असून, २००१ सालापासून त्यात पाणी साठविले जात आहे. अवघ्या १५ वर्षांमधेच धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे दोन वर्षांपूर्वी समोर आले. धरणाला धोका पोहचतो की, काय असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रकरणी जलसंपदातील तत्कालिन अधिकाऱ्यांबरोबरच संबंधित कंत्राटदार कंपनीतील जबाबदार व्यक्तींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धरणाच्या डागडुजीसाठी सरकारने तत्काळ निधी मंजुर केला. गेल्या दोन वर्षांपासून धरणाच्या भेगा बुजविण्याचे आणि धरणाला मजबुती आणण्याचे काम सुरु आहे. दुरुस्तीच्या कामामुळे धरणात दोन वर्षांपासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात आला नाही. खडकक वासला धरण साखळीतील टेमघर धरणाची पाणी साठवण क्षमता ३.८१ टीएमसी असून, त्या पैकी ३.७० टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या पैकी निम्मा साठा धरणात करण्यात आला होता. कामासाठी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यातच धरण रिकामे करण्यात आले होते. ग्राऊटींड (भेगा बुजविणे) आणि पॉलिफायबर रिइन्फोर्स शॉर्र्टफिट या तंत्राच्या आधारे भेगा बुजविणे आणि धरणाला मजबुती देण्याचे काम करण्यात येत आहे. यातील भेगा बुजविण्याचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून, पॉलिफायबर तंत्रज्ञानाने करण्यात येणारे मजबुतीचे काम १० टक्के झाले आहे. भेगा बुजविण्याचे मुख्य काम बहुतांश प्रमाणात झाले असल्याने धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यात येईल. पुढील वर्षी मॉन्सून पूर्वी उरलेले कामही होईल, असे जलसंपदाच्या अधिकाºयांनी सांगितले. ---काय आहे ग्राऊटींग धरणातील भेगा बुजविण्यासाठी सिमेंट कॉंक्रीटमधे प्लाय अ‍ॅश, सिलिका, प्लॅस्टीसायझर आणि या सर्वांना एकत्रित बांधण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या रसायनाचा वापर केला जातो. उच्चदाबाने हे मिश्रण भेगांमधे भरले जाते. या मुळे गळती थांबते. केंद्रीय पॉवर अ‍ॅण्ड रिसर्च स्टेशन आणि जलसंपदा विभााने या कामाचा आरखडा बनिवला असून, त्याच्या चाचण्या देखील घेतल्या आहेत. 

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीRainपाऊसdroughtदुष्काळ