खुशखबर! पुणेकरांची 'लाईफलाईन' उद्यापासून सुरू; पाच महिन्यांनी वाजणार 'डबल बेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 06:51 PM2020-09-02T18:51:35+5:302020-09-02T18:52:54+5:30

लॉकडाऊन काळातील अत्यावश्यक सेवांसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या वगळता सर्वसामान्यांसाठी ही सेवा तब्बल ५ महिने बंदच होती.

Good news! Punekar's 'lifeline' starts from tomorrow; 'Double Bell' to ring in five months | खुशखबर! पुणेकरांची 'लाईफलाईन' उद्यापासून सुरू; पाच महिन्यांनी वाजणार 'डबल बेल'

खुशखबर! पुणेकरांची 'लाईफलाईन' उद्यापासून सुरू; पाच महिन्यांनी वाजणार 'डबल बेल'

Next
ठळक मुद्दे४२१ गाड्या, १९० मार्ग, पहाटे ५ ते रात्री १०

पुणे: सलग ५ महिन्यांच्या बंदीनंतर गुरूवारपासून मध्यमवर्गीय पुणेकरांची सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा सुरू होत आहे. पीएमपीच्या ४२१ गाड्या १९० मार्गांवर धावू लागतील. पहाटे ५ वाजता पहिली डबल बेल वाजेल. रात्री १० वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे.  
कोरोना टाळेबंदीत २३ मार्चला पीएमपीएल बंद झाली होती. त्यानंतर अत्यावश्यक सेवांसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या वगळता सर्वसामान्यांसाठी ही सेवा तब्बल ५ महिने बंदच होती. उद्या (गुरूवारी) पहाटे ५ वाजता ती सुरू झालेली असेल. सरकारने त्यासाठी काही अटी टाकल्या आहेत. त्याचे तर पालन करण्यात येईलच शिवाय पीएमपीएलही कोरोनापासून काळजी म्हणून काही सुविधा देणार आहे.
पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप म्हणाले, मुख्य म्हणजे प्रत्येक बस सॅनीटाईज करून घेण्यात येणार आहे. प्रत्येक प्रमुख स्थानकावर संपुर्ण बस सॅनिटाईज केली जाईल. हे काम खासगी संस्थेकडे दिले असून त्यावर पीएमपीएल अधिकाऱ्यांची देखरेख असणार आहे. प्रवाशांसाठी चालकाकडे सॅनिटायझर असेल. प्रवाशांना सुरक्षित अंतर समजावे यासाठी कुठे बसायचे व कुठे बसायचे नाही यावर मार्किंग करण्यात येणार आहे. चालक हा प्रवाशांपासून पुर्ण विलग असेल. त्याच्या व प्रवाशांच्या मध्यभागी एक अर्धपारदर्शक पडदा लावण्यात येणार आहे.
सरकारने फक्त ५० टक्के क्षमतेनेच पीएमपीएल सुरू करण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे फक्त ४२१ गाड्याच रस्त्यावर असतील. त्या १९० मार्गांनी धावणार आहेत. त्यात स्वारगेट, पुणे स्थानक, शिवाजीनगर या प्रमुख स्थानकांपासून शहराच्या सर्व प्रमुख रस्त्यावर ये- जा करणार आहे. त्याशिवाय अन्य महत्वाच्या ठिकाणांचाही यात समावेश आहे. तिकीटाच्या दरात काहीही बदल करण्यात आलेला नाही. सवलतीही पुर्वी होत्या त्या सुरूच राहणार आहेत असे जगताप यांनी सांगितले.
गुरूवारी पहाटे ५ वाजता पहिली गाडी सुरू होईल. त्यानंतर रात्री १० वाजेपर्यंत सर्व गाड्या सुरू राहतील. सर्व चालक वाहक आता सज्ज आहेत. पीएमपीएल बंद असल्याने शहरातील सर्वसामान्य वर्गाची फार अडचण होत होती. त्यांना रिक्षा परवडत नव्हती. उपनगरांमधून शहरात कामांसाठी म्हणून येणाºया घरकामगार महिला तसेच रोजगारावर काम करणारे पुरूष यांना आता पीएमपीएल सुरू झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

Web Title: Good news! Punekar's 'lifeline' starts from tomorrow; 'Double Bell' to ring in five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.