गुड न्यूज : पुण्यात हाॅटेल मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 13:11 IST2021-02-11T10:48:00+5:302021-02-11T13:11:52+5:30
Pune Hotel News : पुण्यातल्या रेस्टाॅरंट्स , बार , आणि फुड कोर्ट मध्यरात्री एक पर्यंत सुरु ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सध्याचे निर्बंध शिथिल करणारे आदेश काढले आहेत.

गुड न्यूज : पुण्यात हाॅटेल मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
पुणे - पुण्यातल्या रेस्टाॅरंट्स , बार , आणि फुड कोर्ट मध्यरात्री एक पर्यंत सुरु ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सध्याचे निर्बंध शिथिल करणारे आदेश काढले आहेत. त्यामध्ये ही सुट देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याच बरोबर मद्यविक्री साठीही रात्री साडेदहा पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरातले हाॅटेल्स ११ ला बंद केले जात होते. लवकर बंद करायचे आदेश असल्याने अनेक हाॅटेल्स मध्ये ग्राहकांना १०:३० पर्यंतच सेवा दिली जात होती. आता मात्र रात्री १ पर्यंत हाॅटेल सुरु ठेवायला परवानगी देण्यात आली आहे
या बरोबरच शहरातील स्पा देखील सुरु करायला देखील महापालिकेने परवानगी दिली आहे. केवळ खेळाडूंसाठी आत्तापर्यंत सुरु असलेले जलतरण तलाव देखील सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहेत.