शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर..! वाहतूक नियम पाळणाऱ्यांना मिळणार ' गिफ्ट कुपन '

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 13:52 IST

लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लागावी, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे़. 

ठळक मुद्देवाहतूक विभागाचा उपक्रम १३५ नामांकित हॉटेल आणि दुकानांमध्ये १० टक्के किंवा त्यांच्या इच्छेनुसार खरेदीवर सूट

पुणे : दुचाकी व चारचाकी वाहन चालविणाऱ्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने अभिनव आभार योजना सुरू केली आहे़. सर्व प्रकारचे वाहतूक नियमांचे पालन करतात़. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे वाहतूक नियम मोडल्याचे चलन नाही, अशा वाहनचालकांना प्रोत्साहन म्हणून १३५ नामांकित हॉटेल आणि दुकानांमध्ये १० टक्के किंवा त्यांच्या इच्छेनुसार खरेदीवर सूट देण्याचे कुपन (व्हाऊचर) योजना सुरू केली आहे़. या योजनेअंतर्गत गेल्या दोन दिवसांत सुमारे दीडशे वाहनचालकांना व्हाऊचर देण्यात आले आहे़. याबाबतची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली़. वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. यासाठी वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी मोहीम सुरू केली असून, ठिकठिकाणी कारवाई सुरू आहे. अनेकदा अशा कारवाईवेळी अडवलेल्या वाहनचालकावर कुठल्याही प्रकारचे चलन प्रलंबित नसते. तसेच त्याच्याकडे हेल्मेट, लायसन्स, गाडीचे आवश्यक कागदपत्रेही असतात. अशाप्रकारे सर्व वाहतूक नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना व्हाऊचर गिफ्ट देऊन कौतुक करण्यात येत आहे. लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लागावी, हा या योजनेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले़ यासाठी शहरातील सुमारे १३५ नामांकित दुकानदार स्वत:हून पुढे आले आहेत. ही योजना ऑनलाइन पद्धतीने तयार करण्यात आली आहे. वाहनचालकाला अडविल्यानंतर, त्याच्याकडे गाडीची आवश्यक कागदपत्रे असली, तर त्याला एक क्रमांक त्याच्या मोबाईल नंबरवर पाठविण्यात येईल. 

........असे मिळणार वाहनचालकांना कुपनहा क्रमांक म्हणजेच व्हाऊचर असून, यावरून संबंधित वाहनचालकाला शहरातील १३५ हॉटेल, दुकानांमध्ये वस्तू खरेदीवर सूट मिळणार आहे. वस्तू खरेदीच्या एकूण बिलावर १० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येईल. कुपन मिळाल्यानंतर, पुढील एक महिन्यात त्याचा वापर न केल्यास ते बाद होणार असल्याचे सांगण्यात आले़. ............ 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर