शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

पुणेकरांसाठी गुडन्यूज... अजित पवारांच्या प्रवासानंतर मेट्रोच्या वेळेत झाला बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 09:44 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात.

पुणे - येथील चांदणी चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण, खेड बायपास, पुणे बायपास व एकलहरे मार्गांचे चौपदरीकरण तसेच पुणे मेट्रोच्या ‘एक पुणे’ मेट्रो कार्डचे लोकार्पण कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी रुबी हॉल ते वनाझ दरम्यान पुणे मेट्रोनं प्रवास करुन प्रवासी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी, अजित पवारांनी मेट्रोतील प्रवाशांना मेट्रो सोयीची पडते का, तिकीट दर किती आहे, यांसह अनेक सवाल केले. तसेच, मेट्रोच्या वेळेसंदर्भातही विचारणा केली होती. आता, अजित पवारांच्या सूचनेनुसार वेळेत बदल करण्यात आला आहे. 

पुण्यातील आमदार महेश लांडगे यांनी मेट्रोच्या वेळेत झालेल्या बदलाची माहिती दिली. खुशखबरी ! प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन दि. १७ ऑगस्टपासून पुणे मेट्रो सकाळी ६ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुणे स्टेशन येथून मुंबईला जाणारी सकाळची ७:१५ वाजताची डेक्कन क्वीन पकडणे शक्य होईल. तसेच, मागणी आल्यास मेट्रोची सध्याची रात्रीची कमाल वेळ १० ऐवजी ११ करण्यात येईल, अशी माहिती आमदार लांडगे यांनी ट्विटरवरुन दिली आहे. त्यामुळे, आता पुणेकरांचा प्रवास आणखी सुकर होणार आहे. तसेच, पुण्याहून मुंबईसाठी दैनिक प्रवास करणाऱ्या किंवा इतर प्रवाशांनाही या वेळेतील बदलाचा अधिक फायदा होईल. दरम्यान, यापूर्वी सकाळी ७ वाजता मेट्रो सुरू होत होती, ती रात्री १० वाजेपर्यंत चालवण्यात येत होती. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन यासंदर्भाने अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात प्रस्तावित मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या कामाला गती देतानाच शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाचा वेग वाढवावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो प्रवासादरम्यान दिले होते.

विधानभवन येथे आयोजित आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाला गती देण्याच्यादृष्टीने प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जागा, खासगी जागांबाबत सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि गतीने काम करावे. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी महानगरपालिका तसेच पोलीस वाहतूकांनी समन्वयाने वाहतुकीचे नियोजन करावे, असेही त्यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस